BJP : मस्जिद आमची आहे, आमचीच राहणार.. तुमचे 56 तुकडे करू; भाजप नेत्याला धमकीचं पत्र

'आमच्या धर्माबद्दल पोस्ट लिहिली तर उदयपूरमध्ये कन्हैयालालची जी अवस्था झाली, तीच अवस्था तुमची होईल.'
BJP leader Charul Agarwal
BJP leader Charul Agarwalesakal
Summary

'आमच्या धर्माबद्दल पोस्ट लिहिली तर उदयपूरमध्ये कन्हैयालालची जी अवस्था झाली, तीच अवस्था तुमची होईल.'

राजस्थानमधील (Rajasthan) अलवर येथील भाजप नेत्या चारुल अग्रवाल (BJP leader Charul Agarwal) यांना ज्ञानवापी मशिदीबाबत (Gnanavapi Masjid) सोशल मीडियावर भाष्य करणं कठीण बनलंय. चारुल यांना त्यांच्या सोसायटीच्या लिफ्टजवळ धमकीचं पत्र मिळालंय. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीनं शिरच्छेद करून 56 तुकडे करण्याची धमकी दिलीय. याबाबत चारुल यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आहे.

चारुल यांनी सांगितलं की, मी संभल (यूपी) येथून बीएससी आणि मुरादाबादमधून एमएसी केलं आहे. त्यानंतर आयआयटी दिल्लीतून एम.टेक. केलं. सध्या मी अलवर इथं टॉवर क्रमांक 3 मध्ये राहते. सोमवारी सकाळी 7.45 वाजता मुलांना शाळेत सोडण्यासाठी मी फ्लॅटच्या बाहेर आली असता, मला खिडकीजवळ एका लिफाफ्यात एक पत्र दिसलं. त्यात जीवे मारण्याची धमकी देत ​​25 सप्टेंबर ही तुमची शेवटची तारीख असेल, अशी धमकी दिलीय.

BJP leader Charul Agarwal
Police : तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल; पोलीस कर्मचारी निलंबित

ज्ञानवापी आमची आहे आणि आमचीच राहणार, असंही या पत्रात म्हटलंय. आमच्या धर्माबद्दल पोस्ट लिहिली तर उदयपूरमध्ये कन्हैयालालची जी अवस्था झाली, तीच अवस्था तुमची होईल, असं सांगत गुस्ताख-ए-रसूलच्या शिक्षेनुसार तुमचे 56 तुकडे करु, अशी धमकीही त्यांनी देण्यात आल्याचं चारुल यांनी सांगितलं. चारुल यांनी ज्ञानवापीबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. 13 सप्टेंबर रोजी चारुल यांनी फेसबुकवर ज्ञानवापीबद्दल एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर 19 सप्टेंबरपासून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.

BJP leader Charul Agarwal
माझ्यामागं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची ताकद, मी कोणालाच घाबरत नाही : आमदार शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com