Devendra Fadnavis
Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भरली गेलेली बिले पुन्हा आल्याने महापालिकेकडून वर्षा बंगल्याला डिफॉल्टर ठरविले. आता महापालिकेने चूक मान्य करत सुधारणा केलेली बिले पाठविली असून, ती भरली गेली आहेत. त्यामुळे आम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही असे प्रत्युतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांची नावं बीएमसीने पाणीपट्टी भरली नसल्याने डिफॉल्टर यादीत टाकण्यावरुन टीका केली होती. यांचे पाणी तोडून टाका… बिना आंघोळीचं त्यांना विधानभवनात येऊ दे. त्याशिवाय यांना कळणार नाही अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस यांच्या "वर्षा' बंगल्याची पाणीपट्टी थकीत असल्यावरून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी चिमटे काढले. त्यानंतर महापालिकेकडे पाणीदेयकाचा तातडीने भरणा करण्यात आला. मुख्यमंत्री निवासस्थानातील कॅंटीन आणि बंगला यांच्यात पाणीदेयकाबाबत वाद असल्यामुळे भरणा करण्यात आला नव्हता. हा वाद संपुष्टात आल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने देयकाची रक्कम अदा केली, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने 'वर्षा' बंगल्याची सात लाख 44 हजार 981 रुपयांची पाणीपट्टी महापालिकेला अदा केली. 

भाजप कार्यकर्ते असले, तरीही कारवाई : मुख्यमंत्री
सोशल मीडियावरून शिवीगाळ करून धमक्‍या देणारे कोणीही असले आणि त्यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असले, तरीही त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत हे सरकारच्या धोरणावर वारंवार टीका करीत असल्याने त्यांना समाज माध्यमातून वारंवार शिवीगाळ करून धमक्‍या देण्यात येत असल्याचा मुद्दा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गटनेते बाळासाहेब थोरात, उपनेते नसीम खान यांनी आज उपस्थित केला. याप्रकरणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने दोन दिवसाआधी फडणवीस यांची भेट घेऊन तक्रारही केली होती. कॉंग्रेसने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अशा प्रकारे धमक्‍या देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल; त्यात भाजपचा कार्यकर्ता असला, तरीही त्याची गय केली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT