महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीसांचे 'हे' शिलेदार मुख्यमंत्र्यांसोबत अयोध्या दौऱ्यावर! गुवाहाटीपासूनच आहेत मागावर

संतोष कानडे

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक कालच अयोध्येकडे रवाना झाले होते. शिंदेंच्या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

एकनाथ शिंदे आपल्या पक्षासह अयोध्या दौऱ्यावर निघेलेले असले तरी भाजपचे चार महत्त्वाचे नेते शिंदेंसोबत अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. ज्यांनी गुवाहाटीचं बंड यशस्वी करण्यासाठी उपाययोजना आखल्या ते देवेंद्र फडणवीस यांचे शिलेदार पुन्हा अयोध्येला रवाना झालेले आहेत.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, संजय कुटे, मोहीत कंबोज हे चौघे अयोध्येला रवाना झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार, पदाधिकारी प्रभू रामाचं दर्शन घेणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत. तसेच शरयू नदीकाठी महाआरती संपन्न होईल. अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत जगद्गुरु परमहंस आचार्य हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करतील.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभा राहात आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण करीत असल्याच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAN 2.0 : नेमकी काय भानगड आहे 'PAN 2.0' ; आता नवीन कार्ड तयार करावं लागणार का?

ENG vs IND: कॅप्टन म्हणून पहिल्याच मालिकेत काय शिकलास? शुभमन गिलच्या उत्तराने जिंकली सर्वांची मनं; सिराजबद्दल म्हणाला...

Navnath Kudale : ‘आयटी’ सोडून तरुणाला दुग्ध व्यवसायाची गोडी; दररोज सरासरी ६० लिटर उत्पादन

VIRAL VIDEO: अरे हे काय? अजय देवगणचं पीक आलं! झाडीमागून येणाऱ्या ड्युप्लीकेट्सना पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा

Coconut Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला फटका! सणासुदीच्या काळात नारळाच्या किंमती वाढल्या, नवे दर काय ?

SCROLL FOR NEXT