
वाशी : श्रावण महिना एक पवित्र महिना असून या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. यावेळी अनेक भक्त उपवास, विविध पूजा आणि विधी करतात. तसेच भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ध्यान करतात. यामुळे तसेच सध्या सणांचा काळ सुरु झाला असून याकाळात नारळाचा वापर धार्मिक विधी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. मात्र अशातच आता नारळाचे दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.