महाराष्ट्र

‘महानिर्मिती’त कोळशाचा तुटवडा

नीलेश छाजेड

एकलहरे (जि. नाशिक) - राज्यातील सातही औष्णिक केंद्रांत अर्धा ते चार दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक राहिला आहे. महानिर्मितीला वीजपुरवठा करणाऱ्या डब्ल्यूसीएल कंपनीत सुरू असलेल्या संपामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात भारनियमनाचे संकट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

सध्या महानिर्मितीचे राज्यातील ३० संचापैकी निम्म्याहून अधिक संच बंद आहेत. गत २ वर्षांपासून ऐन सणासुदीच्या काळातच नेमका कोळसा तुटवडा होत आहे. याआधी सर्व वीज केंद्रांमध्ये आठ ते दहा दिवस पुरेल, एवढा कोळसा शिल्लक राहात असे; परंतु आजमितीला संपाचे संकट कोसळले तर कुठे अर्धा दिवस; तर कुठे दीड दिवसाचा कोळसा शिल्लक आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या व कोल इंडियाच्या कोळसा खाणीतील भारतीय मजदूर संघाने आजपासून पाच दिवस; तर इंटक, आयटक, सीटू या संघटनांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. संपामुळे खाणीतील उत्खनन बंद राहणार आहे. त्यामुळे वीज केंद्रांना रोज होणारा पुरवठाही ठप्प होण्याची चिन्हे आहेत. 

राज्यात सद्यःस्थितीला ३० संचापैकी १६ संच बंद असून त्यात कोळसा तुटवड्यामुळे ५ संच बंद ठेवण्यात आले आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता राज्याची मागणी १८ हजार १०३ मेगा वॉट होती; तर राज्याच्या सर्व स्रोतांतून ११ हजार २६९ वीजनिर्मिती सुरू होती. कोळसापुरवठा वेळेत नाही सुरू झाला तर भारनियमन अटळ  असणार आहे.

‘महानिर्मिती’च्या केंद्रात शिल्लक कोळसा
नाशिक १८ हजार ५०० मेट्रिक टन (१. ६८ दिवस), भुसावळ १३ हजार ६७० (०. ६३ दिवस), कोराडी १,१२,२९० (२. ८५ दिवस पुरेल एवढा), परळी ६२, ३०२ मे. टन (४. ६१ दिवस), पारस १६,१०० मे. टन (१. ७६ दिवस), चंद्रपूर ८१, ४०० मे. टन (१.५० दिवस), खापरखेडा ९, ७५०मे. टन (०.३६ तास).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT