Cold
Cold 
महाराष्ट्र

ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडी गायब

सकाळवृत्तसेवा

पुणे - दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची तीव्रतादेखील कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे.

राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे. मागील आठवड्यात निरभ्र आकाशामुळे थंड वाऱ्याचा प्रभाव काहीसा वाढला होता. परिणामी थंडीचा कडाका जाणवू लागला होता. मात्र, आठवड्याच्या अखेरीस पुन्हा ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ तीव्र कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले असून, त्याची तीव्रता कमी होण्याचे चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात हिंदी महासागरामध्ये कमी दाब क्षेत्र नव्याने निर्माण झाले असून, त्याची तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. 

आज व उद्या पावसाची शक्‍यता
कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोमवारी (ता. १९) आणि मंगळवारी (ता. २०) पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. बुधवारनंतर (ता.२१) गोव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे होईल. पुण्यातही सोमवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT