File photo
File photo 
महाराष्ट्र

दोन जागांवर दिल्लीत चर्चा

सकाळवृत्तसेवा

वर्धा : कॉंग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक वर्ध्यात 2 ऑक्‍टोबरला होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. पण, ही बैठक कुठे होईल यावर अद्याप शिक्‍कामोर्तब झाले नाही. या बैठकीकरिता सर्वसेवा संघाचे सभागृह आणि इव्हेंट सभागृहाचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीदिनी ही बैठक घेण्याचा मानस कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व्यक्‍त केला होता. यानुसार महात्मा गांधी यांच्या आश्रम परिसरात ही बैठक व्हावी, अशी अपेक्षा होती. मात्र, आश्रम प्रतिष्ठानने जागा देण्यास नकार दिल्याने आशा मावळली. या नकारापासून सुरू असलेला जागेचा तिढा अद्याप कायम आहे.
बैठक सेवाग्राम येथेच व्हावी याकरिता कॉंग्रेस श्रेष्ठींकरिता सूचना आल्याने या भागात जागा शोधण्याकरिता कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी परिसर पिंजून काढला. यात सेवाग्राम येथील सर्वसेवा संघाच्या सभागृहाचा विचार करण्यात येत आहे. या सभागृहात पूर्वी कस्तुरबा रुग्णालयाचे कामकाज चालायचे. या व्यतिरिक्‍त यवतमाळ-नागपूर बायपासवर असलेल्या इव्हेंट सभागृहाचा बैठकीकरिता विचार करण्यात येत असल्याची माहिती आहे. पण, या दोनपैकी कोणत्या सभागृहात सभा होईल, हे मात्र ठरले नाही. या दोन्ही ठिकाणांवर राहुल गांधी आणि अशोक गेहलोत आणि अशोक चव्हाण यांच्यात दिल्लीत चर्चा सुरू असून तिथेच जागेची निश्‍चिती होणार असल्याची माहिती आहे.
तीन जागांचा प्रस्ताव
बैठकीच्या दिवशी राहुल गांधी यांची सभा आयोजित केली आहे. ही बैठक रामनगर येथील सर्कस मैदान, लोक महाविद्यालय शाळेचे मैदान आणि स्वावलंबी शाळेचे मैदान येथे व्हावी असा प्रस्ताव जिल्हा कमिटीकडून पाठविण्यात आला आहे. बैठकीच्या जागेचाही निर्णय झाला नाही. शिवाय पदयात्रेसंदर्भात परवानगीबाबतही संभ्रमावस्था आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT