Satyajit Tambe
Satyajit Tambe Sakal
महाराष्ट्र

Satyajit Tambe : मोदींच्या फोटोवर टाकली होती शाई; तांबेंचा जुना Photo आला समोर

दत्ता लवांडे

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस नेते सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहीर केली असूनही त्यांनी आपला अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं असून काँग्रेसनेही सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

सत्यजीत तांबे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर "मी अजून काँग्रेसमध्येच आहे, फक्त मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मी या निवडणुकीसाठी भाजपसहीत सर्वच पक्षांकडे मदत मागणार आहे" असं सत्यजित तांबे म्हणाले. तर नाशिकमधून भाजपने आपला उमेदवार उभा केला नसल्यामुळे भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

दरम्यान, सत्यजीत तांबे यांचे जुने फोटो आता व्हायरल झाले आहेत. तांबे यांनी मोदींच्या फोटोवर शाई फेकल्याचा फोटो तुषार खरे या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर देवेंद्र फडणवीस सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

काँग्रेस देणार नाही सत्यजीत तांबे यांना पाठिंबा

काँग्रेसने सुधीर तांबे यांना आपला उमेदवार जाहीर केलं होतं. तर सुधीर तांबेंनी अर्ज न भरता त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा असणार नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. तर सत्यजीत तांबे यांनी आमच्यासोबत बंडखोरी केल्याचा आरोप पटोले यांनी केला.

मुलासाठी वडिलांची माघार

आपला मुलगा आणि तरूण नेतृत्वाने सक्रीय राजकारणात यावं म्हणून सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नसल्याच्या चर्चा आहेत. तर त्यांच्या मुलाला आपल्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नसतानाही अपक्ष फॉर्म भरला. त्यानंतर भाजपकडून त्यांना पाठिंबा मिळण्याचीही शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : जळगाव-पाचोरा रोडवर भीषण अपघातात; ३ शाळकरी मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT