महाराष्ट्र

सहकारमंत्र्यांकडे आता सोलापुरी जेवणाचा थाट 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुंबईतील "सुरुची' या निवासस्थानी गणेश विसर्जनाच्यावेळी महाप्रसादासाठी कडक ज्वारी-बाजरीची भाकरी, शेंगा पोळी, शेंगदाणा चटणी, मिरचीचा ठेचा असा मेनू होता. त्यांच्या निवासस्थानी यापुढेही दररोज बाहेर गावाहून येणाऱ्या किंवा मुंबईतील पाहुण्यांना सोलापुरी जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. 

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जगभरात सोलापूरचे मार्केटिंग केले जात आहे. "आता व्हा ग्लोबल' असा संदेश सोलापूरच्या तरुणांना देत देशमुख यांनी सोलापूरचे मार्केटिंग सुरू केले आहे. 

देशमुख म्हणाले, ""सोलापूरचे मार्केटिंग जगभरात करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना प्रेरणा मिळेल. तरुणांसाठी रोजगारनिर्मिती होऊन सोलापूरच्या विकासाला मदत होईल आणि सोलापूरची स्वतःची आगळी-वेगळी ओळख होऊन नाव जगभर प्रसिद्ध होईल.'' "श्रीं'च्या विसर्जन महाप्रसादावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, मनीषा चौधरी, खासदार संजय पाटील, वैभव नाईकवाडी, अतुल कुलकर्णी, चंदन शिरवाळे, अजित चव्हाण, ऋत्विक भालेकर, चंद्रहास मिरासदार, सहकार सचिव आभा शुक्‍ला याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील मुंबईत कार्यरत असणारे विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 

नाश्‍त्यातही कडक भाकरी 
मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांसाठी केवळ जेवणातच सोलापुरी मेनू मिळेल असे नाही, तर सकाळी होणाऱ्या नाश्‍त्यातही सोलापूरची ज्वारी-बाजरीची कडक भाकरी, शेंगा चटणी व हिरव्या मिरचीच्या ठेच्याची चव चाखायला मिळणार आहे. सकाळच्या नाश्‍त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतच्या मेनूमध्ये सोलापूरच्या या विशेष पदार्थांना स्थान मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT