Rajesh-Tope 
महाराष्ट्र बातम्या

कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा म्हणून...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणासाठी जिल्हा,विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी सरकारमार्फत उपाय योजना करण्यात आल्या आहेत. टोपे यांनी राष्ट्रीय ऑक्सिजन उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून राज्याला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी सूचना दिल्या. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० ड्युरा सिलिंडर आणि दोनशे जम्बो सिलिंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना सूचित केले.

राज्यातील ऑक्सिजन सिलिंडर

  • 400 टन ऑक्सिजनची गरज
  • 1,081 टन उत्पादन क्षमता
  • 17,753 जम्बो सिलिंडर
  • 1,547 बी टाईप सिलिंडर
  • 230 ड्युरा सिलिंडर

आरोग्यमंत्री म्हणाले...

  • जिल्हा आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रात आवश्‍यकतेनुसार ऑक्सिजन बेड उपलब्ध करावेत.
  • ऑक्सिजनची प्रतिदिन गरज लक्षात घेणे 
  • ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर समिती
  • जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहतील. 
  • शंभर किंवा त्याहून अधिक खाटा असलेल्या सार्वजनिक रुग्णालयांनी क्रायो ऑक्सिजन टँक स्थापन करावेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT