

Citizens as Spectators vs. Active Participants
sakal
सांप्रतकाळातील लोकशाहीचे चित्र आक्रसले गेले असून ‘सत्तेसाठी सत्ता’ या उद्दिष्टाभोवती केंद्रित झालेले मूठभरांचे राजकारण हे त्याचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. त्यामुळे मतदारांचे ‘राजेपण’ हे औटघटकेचे ठरते आहे. ते हिरावून घेणारी व्यवस्था त्याला कायमच रांगेत उभी करू पाहते. मग तीच रांग कधी यात्रांची असते, तर कधी जत्रांची असते. कधी त्याला संसारोपयोगी साहित्याचे आमिष दाखविले जाते, तर कधी पैठणीवाटपासाठी मेळे भरविले जातात.