Vitthal-Rukmini
Vitthal-Rukmini Canva
महाराष्ट्र

कोरोनामुळे मृत्यू, इन्शुरन्समधून मिळालेले एक कोटी विठ्ठल चरणी

नामदेव कुंभार

पंढरपूर : पंढरीचा विठुराया हा गरीब कष्टकऱ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. अनेक भाविक दर्शनासाठी शेकडो मैल पायी येतात आणि सावळ्या विठुरायाच्या चरणी लीन होतात. याच विठुरायाच्या गरिब भक्तांमध्ये एक गरीब पण मनाने श्रीमंत आणि दानशूर भक्त भेटला आहे. मंदिरातील दान पेटीत मुंबईतील या भाविकाने तब्बल एक कोटी रुपयांचे दान टाकले आहे. तेही आपले नाव न सांगण्याच्या अटीवर. मंदिर समितीच्या इतिहासामध्ये प्रथमच एका भाविकाने इतकी मोठी देणगी देण्याची घटना समोर आली आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे सर्व मंदिरे बंद आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर ही मागील काही महिन्यांपासून दर्शनासाठी बंद आहे. मंदिर बंद काळात समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये कमालीटी घट झाली आहे. कोरोनाकाळात मंदिर समितीचे सुमारे 45 कोटी रुपयांचे उत्पन्न घटले आहे. अशातच एका भाविकाने आपल्या लाडक्‍या विठुरायाच्या चरणी तब्बल एक कोटीचे दान अर्पण केले आहे. या देणगीमुळे मंदिर समितीला मोठा आधार मिळाला आहे.

मुंबईतील एका विठ्ठल भक्ताचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर भाविकाच्या कुटुंबाला एका इन्शुरन्स कंपनीकडून काही पैसे मिळाले. आलेले सर्व पैसे या भक्ताच्या कुटुंबीयाने विठ्ठलाच्या दान पेटीत अर्पण केले आहेत. इतकी मोठी रक्कम देवूनही या भक्ताने आपले नाव मात्र गुप्त ठेवण्याची विनंती मंदिर समिती केली आहे. यातूनच या भक्ताची विठ्ठलावर असलेली श्रद्धा अधोरेखित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT