Money
Money 
महाराष्ट्र

पतसंस्थांमधील ठेवी असुरक्षित

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - राज्यातील 15 हजार 460 पतसंस्थांमध्ये सुमारे 64 हजार कोटींच्या ठेवी आहेत. मात्र, सभासदांची ठेव सुरक्षित राहावी म्हणून अंदाजित नऊ हजार 439 पतसंस्थांनी सायबर सुरक्षिततेचे ठोस उपायच केले नाहीत. राष्ट्रीयीकृत व बड्या खासगी बॅंकांमधील खाती "हॅक" करून (सायबर गुन्हे) ऑनलाइन पैसे काढण्याचे प्रकार घडूनही पतसंस्था चालक असो की सहकार विभाग त्यांना काहीच देणे-घेणे नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सायबर सुरक्षिततेबाबत सहकार विभाग पतसंस्थांसाठी कृती आराखडा तयार करत आहे. परंतु, तो अद्याप तयार झाला नसल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले.

आपल्या पैशाची बचत होईल, चार पैसे लागून येतील आणि त्याचा भविष्यात मुलाचे शिक्षण अथवा मुला-मुलीच्या लग्नासाठी उपयोग होईल, या उद्देशाने अनेकांनी जवळच्या पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवल्या आहेत. मात्र, मोठमोठ्या बॅंकांचे खाते "हॅक' करून खातेदाराच्या परस्पर रक्‍कम काढून घेण्याचे प्रकार वाढले असतानाही पतसंस्थांनी त्याकडे दुर्लक्षच केल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यातील पतसंस्थांशी सुमारे दीड कोटी खातेदार जोडले असून, त्यांच्या तब्बल 64 हजार कोटी रुपयांच्या ठेवी पतसंस्थांमध्ये आहेत. या पार्श्‍वभूमीवर काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वसामान्यांच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्या पतसंस्थांनी असे उपाय केले आहेत, अशा पतसंस्थांमधील सायबर तज्ज्ञांकडून आता उर्वरित पतसंस्था चालकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

काही पतसंस्थांचे संगणकीकरण झाले नव्हते, तर बहुतांश पतसंस्थांचे ऑनलाइन व्यवहार व नेट बॅंकिंग कमी आहे. सर्वाधिक शाखा असलेल्या पतसंस्थांचे व्यवहार ऑनलाइन आहेत. अशांना सहकार भारतीच्या सायबर सुरक्षा विभागाद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- दिलीप पतंगे, पतसंस्था विभाग प्रमुख, महाराष्ट्र राज्य

मोठमोठ्या बॅंकांमध्ये सायबर गुन्हेगारीतून खाते क्रमांक "हॅक' करून ऑनलाइन रक्‍कम काढून घेण्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्वच पतसंस्थांनी ठोस उपाययोजना कराव्यात, यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. याबाबत लवकरच स्वतंत्र बैठक होईल. प्रत्येक पतसंस्थांमधील ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहावेत, यादृष्टीने प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाईल.
- मिलिंद सोबळे, उपनिबंधक, पतसंस्था, सहकार आयुक्‍तालय पुणे

राज्याची स्थिती
15,460 - एकूण पतसंस्था
1.53 कोटी - खातेदार संख्या
63,957 कोटी - ठेवीची रक्‍कम
9,439 - सायबर सुरक्षेचे उपाय नसलेल्या पतसंस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT