SHEV.jpg
SHEV.jpg 
महाराष्ट्र

शिवसेना व काॅंग्रेसच्या बैठकीनंतर हाेणार 'हा' माेठा खुलासा...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाशिवआघाडीत आता सत्ता स्थापन करण्याच्या घडामाेडींनी वेग आला आहे. सध्या काॅंग्रस नेते आणि शिवसेना नेते यांच्यामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार ट्रायडंट हाॅटेलवरती सध्या बैठक शिवसेना व काॅंग्रेस याच्या नेत्यांमध्ये बैठक हाेत आहे.  या बैठकीत फाॅर्म्युला ठरवला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये काेणाकडे किती खाती व कुठली पदे असतील हे ठरविले जाण्याची दाट शक्यता आहे. 

काॅंग्रेस नेते देखील आता सत्ता स्थापनेसाठी सकारात्मक झाल्याचे दिसून येत आहे. काॅंग्रेसकडून बाळासाहेब थाेरात, पृथ्वीराज चव्हाण, अशाेक चव्हाण, माणिकराव ठाकरे आदी नेते आता ट्रायडंट हाॅटेलवरती पाेहचले असून, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी पाेहचले  आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार बैठक सुरु झाली असून, या बैठकीत महाशिवआघाडीचा फाॅर्म्युला अंतिम हाेण्याची शक्यता आहे. 

आजच शिवसेनेची ताेफ संजय राऊत हे लीलावती हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊऩ घरी पाेहचले असून, त्यांची या बैठकीत काही भूमिका असेल का हे अजून दुलदस्त्यातच आहे.       

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

SCROLL FOR NEXT