admission esakal
महाराष्ट्र बातम्या

पदवीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावरच! ‘पदव्युत्तर पदवी’साठी 29 ते 31 मे दरम्यान प्रवेशपूर्व परीक्षा; ‘पेट’ परीक्षा 30 जूनला; ‘पेट’साठी वेब बेस्ड प्रणाली

बारावीच्या निकालानंतर पदवीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. पदवी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर होणार आहे. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज उपलब्ध असतील, महाविद्यालयाकडून प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होईल.

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीच्या निकालानंतर आता पदवीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. पदवीच्या प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया महाविद्यालय स्तरावरूनच होणार आहे. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज उपलब्ध असतील, महाविद्यालयाकडूनच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होईल, अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून देण्यात आली.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक लागू होणार आहे. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना हे धोरण समजून घ्यावे लागणार आहे. पदवी आता चार वर्षांची करता येणार असून पदव्युत्तर पदवी एक वर्षाची असेल. गुणांची टक्केवारी व क्रेडिट दोन्ही विद्यार्थ्यांना घ्यावे लागतील. दरम्यान, प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे आताच विद्यार्थ्यांनी काढून घ्यावीत. काही दिवसांत पदवीच्या प्रवेशाला सुरवात होणार आहे. नवीन धोरणानुसार परीक्षेचा पॅटर्न ६०-४० असा असणार असून ६० गुणांची परीक्षा विद्यापीठाकडून तर ४० गुण महाविद्यालयाच्या हाती असणार आहेत.

‘पदव्युत्तर पदवी’च्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसर व संलग्न महाविद्यालयामध्ये शिकवल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या www.sus.ac.in या लिंकवरून ऑनलाइन अर्ज करावेत. प्रवेशपूर्व परीक्षा वेब बेस्ड ऑनलाइन प्रणालीद्वारे होणार आहे. परीक्षेची लिंक २४ तास उपलब्ध राहणार आहे. २६ मेपर्यंत प्रवेशपूर्व परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. प्रवेशपूर्व परीक्षेची पूर्वतयारी सराव चाचणी २७ मे रोजी होणार आहे. अंतिम प्रवेशपूर्व परीक्षा २९ ते ३१ मे या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी लिंक २४ तास उपलब्ध असेल, पण विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी केवळ एक तासाचाच असणार आहे.

‘पेट’ची परीक्षा ३० जूनला; परीक्षेसाठी वेब बेस्ड प्रणाली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी ‘पेट’ घेण्याचे नियोजन केले आहे. ३० जून रोजी रविवारी ही परीक्षा होईल. यंदा विद्यापीठात ‘पीएच.डी’च्या जवळपास ४७५ जागा आहेत. देश-विदेशातील विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभाग घेता यावा म्हणून ‘पेट’ देखील वेब बेस्ड घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. परीक्षेची लिंक विद्यार्थ्यांना मोबाइलवर पाठविली जाईल. परीक्षा देताना तो विद्यार्थी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिसणार आहे. तीनवेळा तो कॅमेऱ्यासमोरून हलला की तो परीक्षेतून बाद होणार आहे.

३० जून रोजी ‘पेट’ घेण्याचे नियोजन

पदवीची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर होईल तर पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशासाठी २९ ते ३१ मे या काळात प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. दुसरीकडे ३० जून रोजी ‘पेट’ घेण्याचे नियोजन आहे. वेब बेस्ड ‘पेट’ घेण्यासंबंधीचे नियोजन सुरू असून जेणेकरून देश-विदेशातील विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा देता येईल.

- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT