महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचं चांगभलं होऊ दे; फडणवीसांनी बिरोबाला घातलं साकडं

सकाळ डिजिटल टीम

सांगली: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील धनगर समाज आणि बहुजन समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबा देवाची यात्रा गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगलीच्या (Sangli) आरेवाडी बनामध्ये बिरोबाचे दर्शन घेतले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांचे चांगलं करण्याची सरकारमध्ये इच्छा जागृत होऊ दे अशी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, आरेवाडीतील बिरोबाच्या दर्शनाला सर्व समाजातील लोक याठिकाणी येतात. आज या ठिकाणी येऊन इथला भंडारा कपाळी लावण्याचं भाग्य मला मिळाले याचा मला आनंद आहे. धनगरी डोलाने स्वागत झालं, घोंगडी देऊन, मानाचा फेटा बांधल्याबद्दल मंदिर समितीचे आणि गोपीचंद पडळकर यांचे आभार फडणवीस यांनी मानले.

बिरोबाचं चांगभलं म्हणजे गरिबांचं पसायदान आहे. हे चांगभलं एका व्यक्तीच नसून समाजाचा आहे.

बिरोबाचं चांगभलं म्हणजे गरिबांचं पसायदान आहे. हे चांगभलं एका व्यक्तीच नसून समाजाचा आहे. समाजाच्या, विश्‍वाच्या चांग भल्याकरता प्रार्थना केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांविषयी बोलताना ते म्हणाले, चांगभलंमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे हे चांगभलं आलं. त्यांचं चांगलं करण्याची इच्छा सरकारमधील जागृत होऊदे असेही ते म्हणाले.

निधी संदर्भात बोलताना ते म्हणाले, आरेवाडीच्या विकासासाठी एक आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला मान्यता द्यावी यासाठी राज्य सरकारला विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याबरोबर केंद्राचा देखील निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT