ashutosh kumbhakoni
ashutosh kumbhakoni 
महाराष्ट्र

धनगर आरक्षणासाठी फडणवीस-ठाकरे सरसावले 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - धनगर समाजाला आदिवासींचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या असून, उद्या (ता. 23) राज्याचे महाधिवक्‍ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासोबत निर्णायक बैठक होणार आहे. 

उद्धव यांनी दोनच दिवसांपूर्वी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या माध्यमातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सावंत यांनी धनगर समाजालाही मराठा समाजाच्या धर्तीवर आरक्षण कसे देता येईल यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेण्याची आवश्‍यकता असल्याचे नमूद केले. धनगर समाजाच्या नेत्यांनीही हा निर्णय केंद्राकडे पाठवू नका. इतर राज्यांनी स्वतःच्या अधिकारातच धनगर समाजाला अध्यादेश काढून आरक्षण दिल्याची माहिती दिली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकारे निर्णय घेणे उचित ठरणार नाही, असे स्पष्ट करत कायदेशीर बाबीचा अभ्यास करावा लागेल, अशी भूमिका मांडली. यासाठी महाधिवक्‍ता आशुतोष कुंभकोणी यांच्याबरोबर उद्या मुख्यमंत्री फडणवीस, तसेच उद्धव ठाकरे व धनगर समाजाचे नेते एकत्रित बैठक घेणार आहेत. त्यात इतर राज्यांतील निर्णयाचा अभ्यास करून धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णायक भूमिका घेतली जाईल अशी शक्‍यता आहे. राज्य सरकारला घटनात्मक अडचण येत असल्याचा अभिप्राय कुंभकोणी यांनी दिल्यास मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

लॉंग मार्चचा इशारा 
धनगर समाजाने 27 फेब्रुवारीला महाडच्या चवदार तळ्यापासून मुंबईत विधान भवनावर लॉंग मार्च काढण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये धनगर समाज कुटुंबांसह सहभागी होणार असून सोबत गायी गुरे, मेंढ्या, बकऱ्याही घेऊन येणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबईतून उठणार नसल्याचा इशारा धनगर आरक्षण कृती समितीने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT