Digi-Thane
Digi-Thane 
महाराष्ट्र

दिल्लीत होणार डिजी ठाणेचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा

दहा जानेवारीला मिळणार ‘बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्‍ट’ पुरस्कार 
ठाणे - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ठाणे महापालिकेच्या डिजी ठाणेला बेस्ट डिजिटल सिटी प्रोजेक्‍ट या पुरस्काराने ‘स्मार्ट सिटीस अँड ॲवॉर्ड’ समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या सभारंभात केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते ‘डिजी ठाणे ॲप’चा सन्मान करण्यात येणार आहे.

‘स्मार्ट सिटी’च्या ‘डिजी ठाणे ॲप’ने आत्तापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून, महापालिका व स्थानिक नागरिक यांच्यात डिजिटल कनेक्‍टिव्हिटी आणि सहकार्य साध्य केले आहे. बेस्ट सिटी प्रोजेक्‍टकरिता देशभरातून नामनिर्देशने मागविण्यात आली होती. 

यामध्ये डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीकडून डिजी ठाणे : माहिती आधारित, नागरिक केंद्रित प्रशासनासाठी कटिबद्ध असलेली यंत्रणा या प्रोजेक्‍टचे सादरीकरण करण्यात आले होते. स्मार्ट सिटीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव केला जातो. 

भारतातील पहिला डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्प असणाऱ्या डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीला सन्मानित करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, तसेच ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांच्या मार्गदर्शनात डिजी ठाणेच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. 

ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनाच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान होणार आहे.
डिजिटल इंडियाच्या दिशेने प्रवास करताना ठाणे डिजी हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरला आहे. देशभरात असा प्रकल्प सुरू करणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली होती. या माध्यमातून महापालिकेच्या विविध सोयीसुविधा ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घेता येतात. त्याचबरोबर युवा वर्ग मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या विविध योजनांमध्ये या ॲपच्या माध्यमातून जोडला गेला गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT