Untitled-6.jpg
Untitled-6.jpg 
महाराष्ट्र

जिल्हा बॅंकेतर्फे रब्बीसाठी 157 कोटींचे कर्ज वाटप

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून (पीडीसीसी) सर्वाधिक 78 कोटी 70 लाख 70 हजार रुपयांचे पीक कर्ज हे बटाटा लागवडीसाठी घेतले आहे. बटाट्यानंतर कांदा लागवडीस कर्ज घेण्याचे प्रमाण मोठे असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

दरम्यान, केळी, आंबा या फळपिकांसह गुलाब, जरबेरा, कार्नेशन यासारख्या फूल पिकांसाठी कर्ज घेण्यासाठी अद्याप एकही शेतकरी धजावला नाही. त्यामुळे या पिकांसाठीचे आतापर्यंत एक रुपयांचेही कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेले नसल्याचेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यात दरवर्षी 1 ऑक्‍टोबरपासून रब्बी हंगाम सुरू होतो.
त्यानुसार जिल्हा बॅंक या पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत असते. यामध्ये प्रामुख्याने ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, द्राक्षे, केळी, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ढोबळी, ज्वारी, रब्बी बाजरी, भुईमूग आदी प्रमुख पिकांसह अन्य पिकांसाठी कर्ज उपलब्ध करून
देत असते.

या सर्व पिकांच्या कर्ज वाटपासाठी जिल्हा बॅंकेने यंदाच्या रब्बी हंगामात 615 कोटी 16 लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यापैकी 11 नोव्हेंबरपर्यंत प्रत्यक्षात 157 कोटी 97 लाख 17 हजार रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. वाटपाचे हे प्रमाण उद्दिष्टाच्या 25.68 टक्के आहे. या कर्जाचा आतापर्यंत 30 हजार 120 शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. खेड तालुक्‍यातील 493 शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

पीकनिहाय कर्जाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या- ऊस -1 हजार 487, टोमॅटो - 2 हजार 388, कांदा - नऊ हजार 138, बटाटा- 15 हजार 916, द्राक्षे - केवळ 40, डाळिंब - 44 आणि ज्वारी - 1 हजार 107 अशी आहे.


प्रमुख पिकांचे कर्ज वाटप (रुपयांत)
ऊस --- 14 कोटी 40 लाख 96 हजार
टोमॅटो --- 15 कोटी 80 लाख 44 हजार
कांदा --- 44 कोटी 41 लाख 52 हजार
बटाटा --- 78 कोटी 78 लाख 70 हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT