महाराष्ट्र

दुष्काळाचा महामदत सर्व्हे ; 172 तालुक्‍यांचा समावेश

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील 355 पैकी 172 तालुक्‍यांमध्ये सरासरीच्या 25 ते 75 टक्‍के पाऊस पडला आहे. सरकारने जाहीर केलेल्या 172 तालुक्‍यांतील बाधित क्षेत्राचा शासकीय यंत्रणेकडून "महामदत' या ऍपद्वारे सर्व्हे सुरू झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळणार हे अस्पष्टच असल्याने खरीप वाया गेलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची चिंता सतावत आहे. 

यंदा राज्यातील बळिराजाला वरुणराजाने हुलकावणी दिली. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा खरीप वाया गेल्याने यंदाची दिवाळी अंधारातच जाणार असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार दुष्काळी स्थितीचा अहवाल बुधवारपर्यंत अपेक्षित आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर जलयुक्‍त शिवार योजनेची कामे होऊनही अशी स्थिती निर्माण झाल्याने या योजनेतील कामांबाबत शंका उपस्थित होत आहेत. 

ऐन दिवाळीत पाणीटंचाई 

पावसाअभावी सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती या जिल्ह्यांची पाणीपातळी एक ते अडीच मीटरने खालावली आहे. लघू व मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून, धरणातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर टंचाई आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सोलापूर, लातूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांकडे गावकऱ्यांनी टॅंकरची मागणी केली आहे. 

टंचाईग्रस्त विभागनिहाय तालुके 

कोकण : 3 
नाशिक : 27 
पुणे : 30 
कोल्हापूर : 10 
औरंगाबाद : 26 
लातूर : 29 
अमरावती : 25 
नागपूर : 22 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT