dust storm
dust storm Sakal
महाराष्ट्र

'डस्ट स्टॉर्म'चा फटका : मुंबई,ठाणे,पुण्यात धुळीची चादर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह ठाणे,नवी मुंबई परीसरात आज दिवसभर धुळीची चादर पसरली होती. आखाती देशातून आलेल्या 'डस्ट स्टॉर्म'चा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. धुळी कणांमुळे प्रदूषणाची पातळी देखील वाढली आहे. हे वातावरण आरोग्यास धोकादायक असल्याचे सांगून काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. (Mumbai Dust storm Updates)

नवीन वर्षात पहिल्यांदाच शनिवारी मुंबईकरांनी स्वच्छ हवेचा आनंद घेतला. मात्र दुसऱ्याच दिवशी प्रदूषणाची पातळी वाढली. रविवारी सकाळपासून हवेमध्ये धुळीचा लोट दिसला. हवेत प्रचंड धुळीचे कण असल्याने 50 फुटावरील गोष्टी दिसणे अवघड झाले होते. सगळीकडे धुरकट वातावरण असल्याने दृश्यमानता कमी झाली होती.

आखाती देशांमध्ये 'डस्ट स्टॉर्म' म्हणजेच धुळीचे वाढलं उठलं आहे. हे डस्ट स्टॉर्म वाऱ्याच्या प्रवाहात मुंबईसह ठाणे,नवी मुंबई आणि पुणे परिसरात दाखल झाल्याचे सफर चे प्रकल्प संचालक डॉ.गुफारान बेग यांनी सांगितले. डस्ट स्टॉर्म मुळे स्वच्छ हवेचा स्तर देखील खालावला आहे. प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढली आहे. पुढील 24 तास ही परिस्थिती कायम राहणार असून त्यानंतर परिस्थिती सुधारेल असे ही बेग पुढे म्हणाले.

'डस्ट स्टॉर्म'मुळे मुंबईतील प्रदूषणाची पातळी घातक स्तरापर्यंत वाढली. आज मुंबईत हवा गुणवत्ता निर्देशांक 'अतिशय वाईट' नोंदवला गेला. मालाड परिसरात सर्वाधिक 'तीव्र प्रदूषण' नोंदवले गेले. तर अंधेरी, चेंबूर,बीकेसी,वरळी, माझगाव, भांडुप मध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 'अतिशय वाईट' नोंदवला गेला. कुलाबा हवेचा दर्जा 'वाईट' नोंदवला गेला असून बोरिवली, नवी मुंबईत तुलनेने प्रदूषण कमी असल्याने हवा गुणवत्ता निर्देशांक 'मध्यम' नोंदवला गेला.

तीव्रप्रदूषण हे आणीबाणीच्या परिस्थितीची आरोग्य चेतावणी देते, त्यामुळे तात्काळ उपाय करणे आवश्यक असल्याचे सफर ने सांगितले आहे. हवेचा स्तर खालावल्याने आणि प्रदूषण वाढल्याने हे वातावरण आरोग्यास धोकादायक आहे. अगदी सामान्य जनतेमध्ये देखील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीची चेतावणी देण्यात आली असून यामुळे श्वसनाचे विकास संभावण्याचा गंभीर धोका आहे. त्यामुळे पहाटे ऊन यायच्या आधी जॉगिंग करू नये असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. घराबाहेर पडल्यास मास्कचा वापर करावा. अन्यथा अशा वातावरणात सर्दी,खोकला,छातीत कफ होण्याचा धोका असून श्वासनाचे आजार जडण्याचा धोका असल्याचे ही डॉ. जोशी म्हणाले.

परिसर हवा गुणवत्ता निर्देशांक दर्जा

  • मुंबई 333 अतिशय वाईट

  • मालाड 436 तीव्र प्रदूषण

  • माझगाव 372 अतिशय वाईट

  • चेंबूर 347 अतिशय वाईट

  • अंधेरी 340 अतिशय वाईट

  • भांडुप 336 अतिशय वाईट

  • वरळी 319 अतिशय वाईट

  • बीकेसी 307 अतिशय वाईट

  • कुलाबा 221 वाईट

  • बोरीवली 162 मध्यम

  • नवी मुंबई 101 मध्यम

आखाती देशातून आलेल्या 'डस्ट स्टॉर्म'चा परिणाम जाणवत आहे. हवेत धुळीचे प्रमाण वाढले असून प्रदूषणाची पातळी वाढली आहे. 'डस्ट स्टॉर्म'चा परिणाम हळूहळू कमी होणार असून उद्यापर्यंत हवेचा दर्जा सुधारेल.

-डॉ. गुफरान बेग, प्रकल्प संचालक , सफर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT