Eknath Shinde and Narendra Modi 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : राज्यात 45 हून अधिक जागा जिंकू; NDAच्या बैठकीत शिंदेंची गर्जना

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - २०२४ लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अप्रत्यक्षरित्या आजपासून सुरू झाला आहे. बंगळुरू येथे विरोधकांची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत देशभरात २६ पक्ष सामील झाले होते. तर तिकडे दिल्लीत एनडीए अर्थात सत्ताधारी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी गर्जना केली.

एनडीएच्या बैठकीत सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी शिंदे यांनी एनडीए देशात 350 पेक्षाजास्त आणि राज्यात 45 पेक्षाहून अधिक जागा जिंकेल, असं म्हटलं. आगामी लोकसभा निवडणुका सोबत लढणार असून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 45 जागा निवडून आणणार असल्याच शिंदेंनी नमूद केलं. अजित पवार यांनी देखील सोबतच निवडणुकी लढविणार असल्याचं म्हटलं.

एनडीएमध्ये ३८ पक्षांचा सहभाग होता. एनडीए'च्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आल्याचं दिसून आलं. बैठकीत एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यामध्ये बसलेले होते. तर अमित शहा यांच्या बाजूला अजित पवारांना स्थान देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेसने निर्माण केला पेच? विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर ठोकला दावा!

५ हजार देशील तरच... अभिनेता सुशांत शेलारने खंडणी मागितली? मराठी उद्योजकाचा थेट आरोप; रेकॉर्डिंगही ऐकवली

Latest Marathi News Updates : नांदगाव मतदारसंघाच्या आमदाराची पंजाबमधील आपत्तीग्रस्तांसाठी ९ लाख रुपयांची आर्थिक मदत

Supreme Court on Bihar SIR Case : बिहार 'SIR' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘आता आधार कार्ड....’

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

SCROLL FOR NEXT