सोलापूर : यंदाचा खरीप हंगाम सध्या सुरू झाला असून १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी ४६ लाख ८२ हजार मेट्रिक टन खत आवश्यक आहे. पण, सध्या त्यातील २५ लाख ५३ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. खतांचा तुटवडा भासू शकतो म्हणून अनेकांनी आतापासूनच खतांचा साठा करून ठेवायला सुरवात केली आहे. त्यातच तीन मिश्र खतांच्या प्रत्येक बॅगची किंमत गतवर्षीपेक्षा यंदा २०० ते २५० रुपयांनी वाढली आहे.
दरवर्षी रासायनिक खतांची मागणी वाढू लागली आहे. २०२०-२१ या वर्षात खरीप व रब्बी हंगामात ७३ लाख मे.टन खताचा वापर झाला होता. त्यानंतर २०२२ मधील दुष्काळात देखील ६५ लाख मे.टन खत वापरला गेला. हा वापर आता ७५ लाख मे.टनांवर पोचला आहे. युरिया व ‘डीएपी’ला केंद्र शासनाचे अनुदान असल्याने त्या दोन्ही खतांच्या किंमती स्थिर आहेत. परंतु, बाकीच्या मिश्र खतांच्या किंमतीवर शासनाचे नियंत्रण नाही. त्या मिश्र खतांमधील ‘एनपीके’साठी (नत्र, स्पूरद, पालाश) केंद्राकडून प्रतिकिलो सबसिडी मिळते, मात्र अन्य घटकांसाठी अनुदान मिळत नसल्याने खतांच्या किंमती वाढत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, खतांची मागणी जास्त असल्याने अनेकजण मूळ किंमतीपेक्षा जास्त पैसे घेत असल्याने शेतकऱ्यांना काही खतांच्या बॅगसाठी ४०० ते ५०० रुपये जादा मोजावे लागत आहेत. खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण खरीप हंगामात २५ ते ३० कोटी रुपये जादा मोजावे लागणार आहेत.
सध्या खतांची उपलब्धता
खतांचा प्रकार उपलब्ध साठा
डीएपी १.०३ लाख मे.टन
युरिया ७.२० लाख मे.टन
एमओपी १२ लाख मे.टन
एसएसपी ५.३० लाख मे.टन
एकूण २५.५३ लाख मे.टन
खतांचा आवश्यकतेनुसार होईल पुरवठा
खरीप पेरणीच्या अनुषंगाने नुकताच राज्यभरातील आढावा घेतला. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खतांचा पुरवठा होईल, असे नियोजन केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास ४७ लाख मेट्रिक टन खत मंजूर आहे. त्यातील २६ लाख मे.टन खत सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. यंदा तीन मित्र खते सोडली तर बाकीच्या खतांच्या किंमती स्थिर आहेत.
- सुनील बोरकर, संचालक, कृषी (गुणनियंत्रण)
बॅगची नवी किंमत (रुपयांत)
खताचा प्रकार पूर्वीची आताची
१०:२६:२६ १४५० १७५०
१२:३२:१६ १४५० १७५०
१५:१५:१५ १४७० १७५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.