आरोपींनी अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला, अशी तक्रार एका अल्पवयीन मुलीने वडिलांसह शेगाव पोलिस ठाण्यात दाखल केली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तिघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.