crime death to get amount of insurance  3 accused in arrest
crime death to get amount of insurance 3 accused in arrest esakal
महाराष्ट्र

Beed News : बीडमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला! डोळा, चेहऱ्यावर खोल वार; चाकणकरांच्या ट्विटमुळं खळबळ

Amit Ujagare (अमित उजागरे)

बीड शहरात तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तरुणीचा डोळा आणि चेहऱ्यावर खोल वार झाले आहेत. या हल्ल्यातील आरोपीला अटक झाली असून कोर्टानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे, त्यामुळं खळबळ उडाली आहे. (Fatal attack on girl in Beed MSCW has take cognizant of this incident says Rupali Chakankar)

चाकणकर यांनी म्हटलं की, "या प्रकरणातील पीडितेनं काही महिन्यांपूर्वी आरोपीविरोधात पोलीस तक्रार केलेली होती. मात्र त्यानंतरही असा जीवघेणा हल्ला झाल्याने याआधीच्या तक्रारीवेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची राज्य महिला आयोगानं दखल घेतली असून याबाबत बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागविण्यात आला आहे, अशी माहिती चाकणकर यांनी दिी आहे.

एकूणच गेल्या काही महिन्यांतील राज्यातील महिलांवरील हल्ल्याची प्रकरणे पाहता त्रास होत असताना पोलीस तक्रार करुनही कारवाई न झाल्यानं नंतर आरोपींचं मनोबल वाढतं आणि प्रकरण गंभीर गुन्ह्यापर्यंत जातं. त्यामुळं पोलिसांची महिलांच्या तक्रारीवरची भूमिका स्पष्ट करावी. तसेच याची गृह विभागाकडून तात्काळ दखल घेतली जावी अशी मागणीही त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीपुढे बेंगळुरूचे फलंदाज ढेपाळले; अर्धा संघ झाला बाद

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT