excise action solapur
excise action solapur sakal
महाराष्ट्र

‘ऑपरेशन परिवर्तन’चा धाक कमी! गावागावांत खुलेआम हातभट्टीची विक्री; ‘एक्साईज’च्या कारवायांत १० महिन्यांत चार कोटींचा मुद्देमाल जप्त

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीण पोलिसांच्या ‘ऑपरेशन परिवर्तन’चा धाक कमी झाल्याने गावठी दारूची नशा आता गावागावात चढू लागली आहे. अनेक तरुणांचा संसार या अवैध दारूमुळे उघड्यावर आल्याची वस्तुस्थिती आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या साडेदहा महिन्यांत (१ एप्रिल २०२३ ते १३ फेब्रुवारी २०२४) तब्बल ५६ हजार लिटर हातभट्टी आणि साडेदहा लाख लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट केले आहे. मंगळवारी (ता. १३) देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) २६० लिटर हातभट्टी व २१ हजार ६५० लिटर रसायन, दुचाकीसह पाच लाख ४८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ग्रामीण पोलिसांच्या तुलनेत आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘हातभट्टीमुक्त जिल्हा’ मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी छापे टाकायला सुरू केले आहे. १ एप्रिल २०२३ पासून आतापर्यंत ५६९ ठिकाणी त्यांनी छापे टाकले आहेत. हातभट्टी विक्रीप्रकरणी ३५८ तर अवैधरीत्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी १०० गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत १०६ वाहने जप्त केली आहेत. उत्पादन शुल्क अ व ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्ट्यांवर धाडी टाकून दोन संशयितांना अटक केली. निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाने सीताराम तांड्यावरही धाड टाकून साडेतीन हजार लिटर रसायन नष्ट केले.

दुय्यम निरिक्षक शिवकुमार कांबळे यांच्या पथकाने बक्षीहिप्परगा येथे तर दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे यांच्या पथकाने गुरप्पा तांडा येथे कारवाई केली. सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरिक्षक सचिन गुठे यांच्या पथकाने गणपत तांडा व सीताराम तांड्यावरील झुडपातील साडेसहा हजार लिटर रसायन नष्ट केले. एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद यांनी सोलापूर-हैदराबाद रोडवर हातभट्टीची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाराला पकडले. निरिक्षक सचिन भवड यांच्या पथकाने वेळापूरच्या (ता. माळशिरस) हद्दीतील हातभट्टीवर धाड टाकली. याच ठिकाणावरून उसात लपविलेले तीन बॅरेल गूळमिश्रित रसायनही नष्ट केले. दुय्यम निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने भाळवणी (ता. करमाळा) येथे कारवाई केली. अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

अवैध हातभट्टी, वाळू वाहतूक सुरूच

‘ऑपरेशन परिवर्तन’च्या मूळ नियोजनानुसार सध्या ग्रामीण पोलिसांकडून कारवाई होत नाही विशेषत: कारवाईत सातत्य देखील नाही. दुसरीकडे अवैध वाळू वाहतूक देखील जोमात सुरू आहे. दोन दिवसापूर्वी सावळेश्वरजवळ अशाच एका वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाला सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या टेम्पोची धडक बसली. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT