महाराष्ट्र

एनआरआयना ‘डॉलरवास्तू योग’

सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई - भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकेचे चलन डॉलर वधारल्यामुळे अनिवासी भारतीयांसह (एनआरआय) परदेशी नागरिकांना भारतातील वास्तूखरेदीची स्वप्ने पडत आहेत. स्थावर मालमत्तेच्या किमती अगोदरच पंधरा ते वीस टक्‍के किमती घसरल्या असताना डॉलर वधारल्यामुळे सरासरी पंधरा टक्‍के इतका लाभ एनआरआयसह इतर परदेशी नागरिकांना सध्या मिळत आहे. यामुळे रिअल इस्टेट ब्रोकरकडे मुंबई, दिल्ली आदी मेट्रो शहरांतील निवास तसेच व्यापारी गाळ्यांच्या खरेदीसाठी विचारणा करणाऱ्यांची संख्या मागील काही दिवसांपासून लक्षणीय वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या समस्या यामुळे रुपयाचे अवमूल्यन मागील काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर होत आहे. यात खंड पडला नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयांचे मूल्य घसरत आहे, तर डॉलर अधिक बळकट होत आहे. यामुळे अनिवासी भारतीयांनी मालमत्तांची चौकशी दलालांकडे सुरू केली आहे. यामध्ये पूर्ण झालेल्या इमारती, व्यावसायिक गाळे, सदनिका यासह नवीन इमारतींच्या नोंदणीबाबत चौकशी केली जात आहे, असे आंतराष्ट्रीय पातळीवर स्थावर मालमत्तेची दलाली करणाऱ्या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. डॉलर वधारल्यामुळे भारतीय स्थावर मालमत्ता खरेदी करताना अथवा नवीन बुकिंग करताना सध्याच्या काळात थेट पंचवीस ते तीस टक्‍के इतका अधिक लाभ मिळतो. त्यामुळे बॅंकिंग, रिअल इस्टेट, भारतीय कायदे याबाबत सल्ला देणाऱ्या जाणकारांना सोबत घेऊन हे व्यवहार पार पाडले जात आहेत.

डॉलरचा भाव वाढल्यामुळे पश्‍चिम आशियाई देशांतील अनिवासी भारतीय, कंपन्या येथे गुंतवणूक करीत आहेत. काही व्यवहार १०० ते २५० कोटी रुपयांच्या घरात आहेत.
- प्रतीक श्रॉफ, आंतराष्ट्रीय ब्रोकर


येथील मालमत्तांना मागणी मुंबई, दिल्ली, नोएडा, पुणे, कोलकाता, चेन्नई, बंगळूर
या देशांतील नागरिक इच्छुक  हाँगकाँग, बॅंकॉक, अमेरिका, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड
यांना हव्या मालमत्ताअनिवासी भारतीय, सॉफ्टवेअर तज्ज्ञ, आयटी कंपन्या, परदेशी उद्योग व कंपन्या आदी.
याकडे कल संपूर्ण इमारतीची खरेदी अथवा नवीन इमारतीतील अनेक मजले खरेदी करण्याकडे कंपन्यांचा कल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT