Friendship Day Special
Friendship Day Special 
महाराष्ट्र

'डोळस' मैत्रीचा आगळावेगळा चेहरा 

सुधाकर काशिद

कोल्हापूर : या दोघींचेही नाव अश्‍विनी. एकीचे वय 13 तर दुसरीचं 14 वर्षे. दोघी कायम एकत्र. पण हिचा चेहरा तिने आणि तिचा चेहरा हिने पाहिलेला नाही. कारण दोघीही जन्मजात दृष्टिहीन. दोघीही जिवाभावाच्या मैत्रिणी. अवघ्या तेरा-चौदा वर्षांच्या या दोघींकडे जणू काही उभे आयुष्य कोळून प्यायलासारखा एक अनोखा समजूतदारपणा दिसून येतो. 

मिरजकर तिकटीला ज्ञानप्रबोधन संचालित अंधशाळा आहे. तिथे या दोघी राहतात. दोघींनाही जन्मापासून दृष्टी नाही. त्यांना शिकता यावे, या हेतूने कुटुंबीयांनी अंधशाळेत त्यांचे नाव घातले. दोघी वेगवेगळ्या कुटुंबांतल्या. पण शाळेत दाखल झाल्या आणि एकमेकीला न पाहताही काही दिवसांत मैत्रिणी झाल्या. या शाळेत दृष्टिहीन 50 मुले-मुली आहेत. यातल्या कोणीच कोणाचा चेहरा पाहिलेला नाही. त्यात या दोन अश्‍विनींची मैत्री म्हणजे जणू मैत्रीचा आगळावेगळा चेहराच. 

शाळेत प्रत्येक जण सकाळी साडेसहाला उठतो, आपल्या कपाटाजवळ जातो. त्याच्या हातात टूथब्रश येतो. सकाळच्या या क्षणापासूनच दोन्ही अश्‍विनींचे मैत्र फुलत जाते. कधी एकीची पेस्ट संपलेली असते, मग दुसरी तिच्या ब्रशवर आपली पेस्ट घालते. कधी एकीने अंथरुणाची घडी घातलेली नसते, मग दुसरीच्या पायात अंथरुण अडकले की ती अंथरुणाची घडी घालते. मग दोघी एकमेकींचे केस विंचरतात. एकीला केसाचा बो आवडतो, दुसरीला फक्‍त एका बाजूला भांग लागतो. विंचरून झाले की दोघी केसांवर हलकासा हात फिरवतात. आपल्या मैत्रिणीने आपले केस विंचरलेत म्हटल्यावर ते छानच असणार म्हणून छान हसतात. 
यातल्या एका अश्‍विनीला सारखी आपल्या आई-बाबा, ताई, दादा, आजोबांची आठवण येते. रात्री झोपताना तिचे मुसमुसणे फक्त दुसऱ्या अश्‍विनीलाच जाणवते आणि "असे रडायचे नाही, घाबरायचे नाही,' असा धीर देत ती समजूत काढते. आणि त्यानंतर दोघींनाही गाढ झोप लागते. 

दोन्ही अश्‍विनी अभ्यासात खूप हुशार. दोघींनाही गाणे म्हणायला आवडते. एक तर नाट्यगीत गायचा प्रयत्न करते. दुसरी पुस्तकातल्या कविता खूप छान म्हणते. कवितेतल्या शब्दा-शब्दांत ती आपला जीव ओतते. यातल्या एकीचे नाव अश्‍विनी डफळे आहे. ती बिद्रीची आहे; तर दुसरीचे नाव अश्‍विनी अजाम आहे. ती जयसिंगपूरची आहे. दोघींना दृष्टी नाही. पण सारी सृष्टी त्या पाहताहेत, असा समजूतदारपणा त्या दोघींकडे आहे. 

एकमेकींना पाहण्याचा विश्‍वास 
पुढे-मागे कधी डोळ्यांना दिसायला लागले तर आई, बाबा, देवबाप्पा आणि त्यानंतर पहिल्यांदा एकमेकींना पाहायचे, असा भाबडा विश्‍वास दोघींत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT