महाराष्ट्र

प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

सकाळवृत्तसेवा

भिवंडी : प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या महिलेवर पाच नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची संतापजनक घटना काल (मंगळवार)  रात्री भिवंडी तालुक्यातील पोगांव पाईपलाईन येथे घडली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना गजाआड केले.

शहरातील शांतीनगर, आझादनगर येथे राहणारा इम्रान सिकंदर खान (26 ) हा त्याच्या 20 वर्षीय मैत्रिणीसोबत ऍक्टिव्हा दुचाकीने फिरण्यासाठी पोगांव पाईपलाईन येथे गेला होता. फिरून झाल्यानंतर ते दोघेही रात्री साडेनऊच्या सुमारास घरी परतण्यासाठी निघाले असता त्यांना पाच नराधमांनी भररस्त्यात अडवले. त्यानंतर इम्रान याच्या डोक्याला गावठी कट्टा व चाकू लावला. तसेच त्याच्या सोबत असलेल्या महिलेला पाइपलाईनच्या बाजूला नेऊन या नराधमांनी पीडीत महिलेवर आळीपाळीने अमानुष बलात्कार केला. बलात्कारानंतर पाचही नराधम फरार झाले. या घटनेने भयभीत झालेला प्रियकर इम्रान याने प्रेयसीला सोबत घेवून भिवंडी तालुका पोलिस ठाणे गाठले. 

त्यानंतर त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास चौगुले यांनी पोलिस उपनिरीक्षक चेतन पाटील यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. यावेळी बलात्कार झालेल्या पाईपलाइनलगतच्या मातीभरावावर नराधमांच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्या पाऊलखुणांचा शोध घेवून पोलिसांनी आजुबाजूच्या नागरी वस्तीत आरोपींचा शोध घेतला.

यादरम्यान येवई हद्दीतील किशोर रघुनाथ लाखात (19) याला ताब्यात घेवून कसून तपास केला असता त्याने अन्य चार जणांच्या साथीने अमानुष बलात्कार केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे फिरवून गुरुनाथ गोपाल बारी (23 रा.येवई ), हर्षद हिरामण मटले (19 रा चावींद्रा ), अविनाश पुंडलिक जाधव ( 24 रा. शेलार ), गणेश पवार (20रा. शेलार ) या पाचही नराधमांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तसेच पोलिसांनी या टोळक्याकडून गावठी कट्टा व धारदार चाकू जप्त केली असून, या नराधमांच्या टोळीने यापूर्वीही पोगांव पाईपलाईन रोडवर प्रेमी युगुलांना गाठून बलात्कार केला असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT