Ram Kadam
Ram Kadam 
महाराष्ट्र

राम कदमांना 'या' मुलीचे ओपन चॅलेंज

सकाळवृत्तसेवा

मुंबई : 'तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असे बेताल वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांना पुण्यातील एका मुलीने ओपन चॅलेंज दिले आहे.

राम कदम यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पुण्यातील मिनाक्षी डिंबळे-पाटील या युवतीने म्हटले आहे, की राम कदम तुम्हाला मी ओपन चॅलेंज करते. तुम्ही मला मुंबईला बोलवा किंवा मी मुंबईत येते. तुम्ही मला एक बोट लावून दाखवा बाकी पुढे बघू. तुमचे वक्तव्य लांच्छनास्पद आहे. आपण महाराष्ट्रात राहतो हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, येथे स्त्रीयांना आदर आहे. तुमच्या वक्तव्याबद्दल शहानिशा करायची आहे, भेटू आपण समोरासमोर. तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट बघत आहे.

सोमवारी घाटकोपर येथे दहीहंडीमध्ये राम कदम यांनी मुक्ताफळं उधळल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. कदम म्हणाले, तुम्ही कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केले, पण ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन की, तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या. आई-वडील म्हणाले, की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा, असे त्यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT