crop insurance sakal
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सव्वाकोटी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के पीकविमा मिळणार; राज्य सरकारने कंपन्यांना दिले ४०६ कोटी

‘एक रुपयात पीकविमा’योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हिश्श्याचे ४०६ कोटी रुपये राज्य सरकारने विमा कंपन्यांना वितरीत केले आहेत. त्यामुळे पावसाअभावी खरीप वाया गेलेल्या जवळपास सव्वाकोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतील २५ टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील एक कोटी ७० लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा भरला आहे. ‘एक रुपयात पीकविमा’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हिश्श्याचे ४०६ कोटी रुपये राज्य सरकारने विमा कंपन्यांना वितरीत केले आहेत. त्यामुळे पावसाअभावी खरीप वाया गेलेल्या जवळपास सव्वाकोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतील २५ टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साधारणत: २० ऑक्टोबरपासून भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल.

यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील एक कोटी ४० लाख ९७ हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती. पण, पेरणीनंतर काही दिवसांनी पावसाचा मोठा खंड पडला आणि राज्यातील जवळपास आठशेहून अधिक महसूल मंडळांमधील पिकांना त्याचा फटका बसला. तर पाण्याअभावी पिकांची उत्पादकता देखील कमी झाली.

राज्यातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ४० टक्के सुद्धा पाऊस झाला नाही. त्यावेळी ४५६ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड एक महिन्याचा होता. दुसरीकडे ५८८ मंडळांमध्ये १५ ते २१ दिवस पाऊसच नव्हता. या पार्श्वभूमीवर राज्यातील १५ जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईसंदर्भात अधिसूचना काढली. पण, ‘एक रुपयात पीकविमा’मधील शेतकरी हिश्शाची रक्कम विमा कंपनीला सरकारकडून मिळालेली नव्हती. त्यामुळे कंपन्या गप्प होत्या. आता सरकारने पैसे वितरीत केले असून तत्पूर्वी, विम्यापोटी केंद्र व राज्य सरकारचा तीन हजार कोटींचा हिस्सा देखील कंपन्यांना मिळालेला आहे.

विमा कंपन्यांचे प्रश्न अन्‌ प्रशासनाची कोंडी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप पिकांसंदर्भात अधिसूचना काढून २१ दिवस उलटले आहेत. आता विमा कंपनीने अधिसूचनेवरच आक्षेप घेतल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी साडेतीन लाख हेक्टरवर झाली आणि पीकविम्यासाठी साडेपाच लाख हेक्टरवरील अर्ज प्राप्त झाले आहेत. दुसरीकडे इतर जिल्ह्यांमध्ये सर्वच महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा कमी असतानाही सरसकट जिल्ह्यासाठीच अधिसूचना निघाली आहे. दरम्यान, प्राप्त शेतकरी अर्जांची पडताळणी करण्यासंदर्भात कोणताही नियम त्या पॅटर्नमध्ये नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी कंपन्यांना कळविले आहे. आता त्यावर तेथील जिल्हाधिकाऱ्यांना तोडगा काढावा लागणार आहे.

लवकरच मिळेल पीकविम्याची रक्कम

‘एक रुपयात पीकविमा’मधील सरकारचा हिस्सा आता मिळाला आहे. तत्पूर्वी, केंद्र व राज्य सरकारचा विम्यापोटीचे तीन हजार कोटी रुपये विमा कंपन्यांना दिले आहेत. आता विमा कंपन्यांकडून लवकरच शेतकऱ्यांना भरपाई वितरीत होईल.

- सुनिल चव्हाण, कृषी आयुक्त, महाराष्ट्र

खरीप पीकविम्याची स्थिती

  • अर्जदार शेतकरी

  • १७०.६७ लाख

  • विमा संरक्षित क्षेत्र

  • ११३.२७ लाख हेक्टर

  • एकूण ‘खरीप’ क्षेत्र

  • १४२.१३ लाख हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update:'मुळशीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस'; धरण ९९ टक्‍के भरले, आत्तापर्यंत एकुण ७४२८ मिमी पाऊस

Pune Rain Update:'भोर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस'; वरंधा घाटातील महाड हद्दीत दरड कोसळली, वाहतूक बंद

Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' 10 खास गोष्टी, घरात पसरेल आनंदाची लाट

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT