Land acquisition esakal
महाराष्ट्र बातम्या

फायद्याची बातमी! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा...

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेच्या हद्दीत १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एक-दोन गुंठे जागा घेतली. पण, गुंठेवारीस परवानगी नसल्याने स्टॅम्पवर नोटरी करून जी जागा घेतली. अशांना आता त्या गुंठ्याची खरेदी करून घेता येणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेच्या हद्दीत १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एक-दोन गुंठे जागा घेतली. पण, गुंठेवारीस परवानगी नसल्याने स्टॅम्पवर नोटरी करून जी जागा घेतली. अशांना आता त्या गुंठ्याची खरेदी करून घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित व्यक्तीस जागेच्या चालू मूल्यांकनानुसार स्टॅम्प ड्युटी आणि ज्यावेळी त्याने नोटरी केली तेव्हाच्या मुद्रांक शुल्कावर दरमहा २ टक्के दंड, अशी रक्कम भरावी लागणार आहे.

शहराच्या गावठाण भागात रहायला जागा नसल्याने शहराच्या हद्दीतच एक-दोन गुंठे जागा घेतली. पण, गुंठेवारीला परवानगी नसल्याने त्या जागेची नोटरी केली. गुंठेवारीच्या परवानगीची वाट पहात अनेकांनी त्या जागांवर पक्की घरे देखील बांधली. मात्र, त्यांना ना प्रॉपर्टी कार्ड मिळाले ना जागेची अधिकृत मालकी मिळाली. त्यामुळे त्यांना बॅंकांकडून गृहकर्ज देखील घेता येत नव्हते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आणि नोटरीवर जागा घेतलेल्यांना मोठा दिलासा दिला.

दुसरीकडे अनेकांनी २०- २५ वर्षांपूर्वी काही गुंठे जागा घेऊन ठेवली, पण आता अडचणी असताना देखील त्यांना गुंठेवारीला परवानगी नसल्याने विकता येत नव्हती. त्यांना देखील या निर्णयामुळे गुंठ्यांची विक्री करता येणार आहे. नोटरी केलेल्यांना खरेदीपूर्वी जागेच्या मूल्याकंनानुसार (चालू बाजारभावाप्रमाणे) स्टॅम्प ड्युटी आणि मुद्रांक शुल्कावर नोटरी केलेल्या दिवसापासून दरमहा दोन टक्के दंड, अशी रक्कम जिल्ह्याच्या मुद्रांक शुल्क कार्यालयात भरावे लागेल. त्यानंतर ती जागा मुद्रांकित होईल आणि मग त्याची खरेदी करता येणार आहे.

पूर्वीच्या गुंठ्याची खरेदी अशी...

एखाद्याने पूर्वीच दोन-चार गुंठे जागा खरेदी केली आहे, पण त्याला गुंठेवारीस परवानगी नसल्याने विकता आली नाही. त्या व्यक्तीस आता त्या गुंठ्याची थेट खरेदी-विक्री करता येणार आहे. त्यासाठी त्या जागेचा सातबारा उतारा, आठ-अ, सहा-ड आणि जागेचा झोन नकाशा, अशी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयात जागेच्या मूल्यांकनाच्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी भरून गुंठ्याची विक्री करु शकतो.

नोटरी केलेल्यांना करता येणार गुंठ्यांची खरेदी

राज्याच्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या काळातील शहरांच्या हद्दीतील गुंठ्यांचे व्यवहार नियमित होणार आहेत. त्यासाठी त्यांना स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक शुल्कावरील दंड भरून घ्यावा लागेल. त्यानंतर संबंधितास त्या गुंठ्याच्या खरेदीस परवानगी मिळेल. पण, आता कोणी त्याच्या जमिनीचे गुंठे विकणार असेल तर त्यांना परवानगी नाही.

- अनिकेत बनसोडे, जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike India : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका ! देशात LPG सिलिंडर दरात वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर

Sports News: अपयशी कर्णधाराचा शिक्का लागला असता; राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचे मत

Pimpri Education News: डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक संशोधनावर चर्चासत्र

Akola News:क्रीडा शिष्यवृत्तीतही बॉक्सरांचाच दबदबा; जिल्ह्यातील ४३ खेळाडूंपैकी तब्बल २१ बॉक्सरांची निवड

Satara Politics:साताऱ्याच राजकारण तापणार! भाजप,राष्ट्रवादी-शिवसेना पुन्हा आमने-सामने; जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीकडे लक्ष..

SCROLL FOR NEXT