महाराष्ट्र

फडणवीसांना अटक होणार होती, पण मुंडेनी भुजबळांना फोन केला अन्...- परब

वृत्तसंस्था

मुंबई- नागपूर महापालिकेतील घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार होती. पण फडणवीसांना अटक होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळांना फोन करून अटक टाळण्यासाठी प्रयत्न केले आणि देवेंद्र फडणवीस यांची अटक टळली असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला. ते एबीपी या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

नंदलाल समितीच्या अहवालात देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे, यावर मी आजही ठाम आहे, असेही परब यांनी यावेळी म्हटले आहे. यावेळी भुजबळांनीच फडणवीसांना वाचवलं, मात्र त्याची परतफेड म्हणून त्यांनी भुजबळांनाच आत टाकलं, असा टोलाही अनिल परब यांनी या कार्यक्रमात लगावला आहे.

परब म्हणाले की, नंदलाल समतीच्या अहवालात तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांचं नाव होतं. त्यावर मी आजही ठाम आहे. नंदलाल समतीच्या यादीत 109 जणांची नावं होती, त्यात फडणवीसांचंही नाव होतं. नंदलाल यांना आव्हान आहे, त्यांनी आजही सांगावं की पान नंबर 106 आणि 184 वरील उल्लेख त्यांनी लिहिला नाही हे जाहीर सांगावे, असे म्हणून त्यांनी फडणवीसांना थेट आव्हान दिले आहे. महापौरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही फडणवीसांनी तारखा बदलून सह्या घेतल्या. त्याला जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई करावी असं नंदलाल समितीने म्हटलं होतं. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही फडणवीसांना क्लीन चिट दिलेली नाही. ते प्रकरण तसंच पडले असल्याचेही परब यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT