Swacha Bharat
Swacha Bharat 
महाराष्ट्र

स्वच्छ शहरांना 20 कोटींचा अमृत निधी

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेच्या बाबतीत उत्तम कामगिरी करणाऱ्या व अमृत योजनेतील पहिल्या तीन  शहरांना प्रत्येकी 20 कोटींचा प्रोत्साहनपर अमृत निधी दिला जाणार आहे. याशिवाय,  अमृत योजनेत समाविष्ट नसलेल्या पण राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या शहरांनाही भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. राज्यातील 43 शहरांचा समावेश अमृत योजनेत आहे. 

केंद्र शासनाने राज्यातील 4237 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्व्हेक्षणास सुरूवात केली आहे. हे सर्व्हेक्षण अमृत शहर आणि नॅान अमृत शहरे या दोन गटांत होत आहे. केंद्र शासनाने नॅान अमृत शहरांची विभागणी  पाच गटात केली असून, महाराष्ट्राचा समावेश पश्चिम विभागात आहे. या विभागात महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा या राज्यांचा आणि दीव-दमण या केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यातील एकूण 1017 शहरांचा गुणानुक्रम निश्चित केला जाणार आहे.

स्वच्छ शहरे सर्व्हेक्षण-2019 अंतर्गत गुणानुक्रमानुसार पहिल्या तीन क्रमांकामध्ये येणाऱ्या शहरांना प्रत्येकी 20 कोटी रुपये,  तर चार ते 10 वा क्रमांक मिळवणाऱ्या शहरांना प्रत्येकी 15 कोटी रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. नॅान अमृत शहर गटांमध्ये पहिले तीन क्रमांक मिळवणाऱ्या शहरांना प्रत्येकी 15 कोटी रुपये, चार ते 10 क्रमांक मिळवणाऱ्या शहरांना प्रत्येकी 10 कोटी रुपये, 11 ते 25 क्रमांक मिळवणाऱ्या शहरांना प्रत्येकी पाच कोटी रुपये आणि 26 ते 50 क्रमांकात येणाऱ्या शहरांना प्रत्येकी अडीच कोटी रुपयांचे पारितोषक मिळणार आहे. अोडीएफ प्लस दर्जा आणि थ्री स्टार मानांकन मिळवणाऱ्या शहरांना जुलैमध्ये निधीचे वितरण होईल.

राज्यातील अमृत शहरे
मुंबई शहर, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर,  मिरा-भाईंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड-वाघाळा, कोल्हापूर, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, इचलकरंजी, जालना, अंबरनाथ, भुसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया, बार्शी, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदुरबार, वर्धा, उदगीर, हिंगणघाट. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT