महाराष्ट्र

जुने फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन आता सरकार विकत घेणार?

सकाळ वृत्तसेवा

तुमच्या घरातील फ्रिज, एसी जुने झाले असतील आणि तुम्हाला ते विकायचे असतील तर काळजी करु नका. कारण सरकार जुने फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन्स विकत घेणार आहे. यासाठी सरकार लवकरच स्टील स्क्रॅप पॉलिसी आणणार आहे. त्यामुळे आता जुने फ्रीज, एसी दुय्यम दरात किंवा भंगारात काढण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत स्टील स्क्रॅप पॉलिसीमध्ये फक्त वाहनांचा समावेश होता. पहिल्यांदाच आता एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीनचा समावेश करण्यात येणार आहे.

स्टील स्क्रॅप धोरणांतर्गत अनेक ठिकाणी स्क्रॅप सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रात जाऊन लोकांना स्टील स्क्रॅप विकता येणार आहे. यामध्ये सर्वच प्रकारातील जुन्या स्टीलचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, स्टील तुम्ही स्क्रॅप केंद्रात विकल्यास सरकारकडून इन्सेंटीव्सही मिळणार आहेत.

या धोरणामुळे स्टील आयातीचं प्रमाण कमी होईल असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येतोय. आता सरकारच्या या महत्त्वपूर्ण योजनेला कशाप्रकारे पाठिंबा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

WebTitle : government to implement policy to buy scrap material

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT