Maharashtra
Maharashtra 
महाराष्ट्र

Gulab Cyclone: राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे आता ‘गुलाब’ चक्रिवादळाचे रूपांतर झाले आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पूर्व किनारपट्टीपासून ३०० ते ४०० किलोमीटर अंतरावर तयार झालेले चक्रीवादळ रविवारी (ता. २६) संध्याकाळी उत्तर आंध्रप्रदेश व दक्षिण ओरिसाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे राज्यात मंगळवार (ता.२८) पर्यंत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवारी विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, रविवारनंतर मात्र काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे शहर आणि परिसरातही पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव २६ सप्टेंबरपासून मुंबईत दिसून येईल. २७ आणि २८ सप्टेंबरला मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. याबाबत मुंबईकरांना सतर्क करण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचा परिणाम कोकण आणि मुंबईत दिसून येईल. पावसाची तीव्रता २६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Badminton Rankings: भारताच्या सात्विक-चिरागचा बॅडमिंटनमध्ये डंका कायम! पुन्हा मिळवला नंबर वनचा ताज

अबबऽऽऽ चक्क मिळाले 100 टक्के गुण! बुद्धिबळ खेळणाऱ्या तनिषाने 100 टक्के गुण मिळवत जिंकला 'बारावी'चा डाव

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

RR vs RCB Eliminator : कोणता रॉयल होणार 'इलिमिनेट', धडाकेबाज RCB समोर राजस्थान कामगिरी सुधारणार का?

SCROLL FOR NEXT