Gunratna Sadavarte News
Gunratna Sadavarte News Sakal
महाराष्ट्र

जेलमध्ये गुणरत्न सदावर्तेंचं उपोषण; सरकारी वकिलांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

गुणरत्न सदावर्ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. तिथे त्यांनी जेवण न करण्याचं ठरवलं आहे. सरकारी वकील अरुणा पै यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यातल्या विद्यापीठ पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्तेंविरोधा गुन्हा दाखल झाला आहे.

सदावर्ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये असून त्यांचं सध्या उपोषण सुरू आहे. मागच्या १५ दिवसांपासून सदावर्ते जेवत नसून ते ज्या ज्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत होते, तिकडचे पोलीस वेळोवेळी सदावर्तेंना अन्न ग्रहण करण्याची विनंती करत होते. मात्र सदावर्ते सकाळ-संध्याकाळ केवळ ज्युस पित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्तापर्यंत गावदेवी, सातारा, कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंची कोठडी घेतली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर केला असला तरी इतर गुन्ह्यांमधून त्यांची सुटका झालेली नाही. गुणरत्न सदावर्ते यांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याचा अर्ज केला होता, मात्र त्यांच्याकडे हा ताबा देण्यात आलेला नाही. पुढील कारवाई मुंबईतून होईल, असं कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने काल स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT