Rain Update
Rain Update sakal
महाराष्ट्र

Rain Update: बळीराजा सुखावला! राज्यात पावसाची हजेरी, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजही मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातही आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Latest Marathi News)

पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.(Latest Marathi News)

येत्या 4, 5 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. तर पावसामुळं काही भागात दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. राज्यात सुरु झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.(Latest Marathi News)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT