महाराष्ट्र

समलिंगींना रक्तदानास मज्जाव!

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राष्ट्रीय रक्त संक्रमण समिती अर्थात ‘नॅको’ने रक्तदानातून होणाऱ्या संक्रमण संसर्गाच्या वाढत्या प्रमाणाची चिंता व्यक्त करीत नव्या नियमावलीत रक्तदानासंदर्भात बदल सुचवल्याने व्यावसायिक रक्त पेढ्या आणि रक्तदात्यांना हादरा बसला आहे.

‘नॅको’ने जाहीर केलेल्या नियमावलीत समलैंगिक व्यक्ती आणि कैद्यांना रक्तदान करण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. तुरुंगवासात असलेल्या व्यक्तींना मिळणारा आहार आणि संसर्गजन्य आजाराचे वाढते प्रमाण यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती खूपच कमी झालेली असल्यामुळे त्यांचे रक्त दूषित झालेले असल्याचे मत ‘नॅको’ने नोंदवले आहे. समलैंगिक व्यक्तींमध्ये एचआयव्हीचा संसर्ग शंभर टक्के झालेला असल्याने अशांना तर रक्तदानापासून लांब ठेवण्याच्या सूचना नियमावलीत प्रकर्षाने देण्यात आल्या आहेत. 

यापूर्वीच्या नियमावलीत मलेरिया झालेल्या व्यक्तीला वर्षभरानंतर रक्तदानाची परवानगी होती, मात्र नव्या नियमावलीत मलेरिया रुग्णांच्या यकृतातील विषाणूची व्याप्ती पाहता रुग्ण बरा झाले, असे वाटत असले, तरी तो विषाणू दीर्घ कालावधीपर्यंत शरीरात राहत असल्याने मलेरिया झालेल्यांच्या रक्तालाही तीन वर्षांपर्यंत मनाई करण्यात आली आहे, त्यामुळे अशा व्यक्तींचे 

रक्त कोणालाही देता येणार नाही. ‘नॅको’ने ही नियमावली महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण समितीकडे पाठवली असून, तिची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

रक्ताचा तुटवडा आणि रक्तपेढींची गल्लाभरू प्रवृत्ती यामुळे दात्यांच्या आजारांचा पूर्वेतिहास जाणून न घेता सरसकट धंदेवाईक रक्तदात्यांकडून मिळवलेले रक्त गरजू रुग्णांना देऊन त्यांच्या जिवाशी खेळण्याच्या प्रकाराला नव्या नियमावलीमुळे लगाम लागेल.
- रवींद्रकुमार जाधव, सामाजिक समस्या विश्‍लेषक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT