11th Admission Esakal
महाराष्ट्र बातम्या

अकरावीचा प्रवेश अर्ज भरायचा कसा? आजपासून २ दिवस सराव; बुधवारपासून भरा अर्ज; प्रत्येक फेरीवेळी नव्याने भरावा लागेल पसंतीक्रम; जाणून घ्या, वेळापत्रक व कागदपत्रे

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी १९ रोजी सकाळी ११ ते २० मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सराव सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये भरलेली माहिती २० मे रोजी पोर्टलवरून हटविण्यात येणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी १९ रोजी सकाळी ११ ते २० मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सराव सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये भरलेली माहिती २० मे रोजी पोर्टलवरून हटविण्यात येणार आहे. त्यानंतर २१ ते २८ मेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत.

अकरावीच्या प्रवेशासाठी पुणे विभागात अकरावी प्रवेशासाठी कला शाखेच्या एक लाख तीन हजार ७०५, वाणिज्य शाखेच्या एक लाख एक हजार ९७१ आणि विज्ञान शाखेच्या एक लाख ७० हजार १७० जागा असणार आहेत.

प्रवेशासाठी प्रामुख्याने इयत्ता दहावीची मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा मूळ दाखला, मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला, समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासंबंधीचा दाखला (ईडब्ल्यूएस वगैरे), एससी, एसटी प्रवर्ग वगळता अन्य जात संवर्गातील ज्यांना नॉन-क्रिमिलेअर लागू आहे, त्यांना तो दाखला किंवा दाखला काढण्यासाठी मिळालेली पावती अपलोड करावी लागणार आहे.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका अपलोड न करता त्याचा क्रमांक टाकला तरी चालणार आहे. दुसऱ्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र गुणपत्रिका अपलोड करावी लागणार आहे. यंदा पहिल्यांदाच प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होत असल्याने विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आली तर ८५३०९५५५६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. १० ऑगस्टपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होतील, असे नियोजन आहे.

दिवसनिहाय प्रवेशाचे नियोजन

  • २१ ते २८ मे : प्रत्यक्ष प्रवेशाची नोंदणी, १ ते १० कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम द्यावा. व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्यांक अशा प्रवर्गातून अर्ज करावा. प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांचा ‘कन्सेंट’ आवश्यक असणार.

  • ३० मे : तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.

  • ३० मे ते १ जून : प्रवेश अर्जावर हरकती व दुरुस्तीची प्रक्रिया होईल.

  • ३ जून : अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार

  • ५ जून : गुणवत्ता यादीनुसार प्रवेश वाटपास सुरवात (शून्य फेरी), व्यवस्थापन, इन-हाऊस व अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश ६ जूनपासून सुरू होणार आहेत.

  • ६ जून : सकाळी दहापर्यंत वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध होईल.

  • ६ ते १२ जून : गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ हा पर्याय निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. त्यावेळी आवश्यक कागदपत्रे अपलोड व प्रत्यक्ष तपासणी होईल. पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य असेल.

  • १४ जून : दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होऊन पुढे राहिलेल्यांना प्रवेश मिळतील.

  • १५ जून ते १० ऑगस्ट : रिक्त राहिलेले प्रवेश पाहून गरजेनुसार प्रवेश फेऱ्या होतील.

प्रत्येक फेरीवेळी पसंतीक्रम भरावा लागेल

इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची गुणवत्ता प्रसिद्ध झाल्यावर पहिल्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळणे अपेक्षित असून संबंधित विद्यार्थ्यांनी लगेचच प्रवेश घ्यायचा आहे. याशिवाय ज्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय त्या फेरीत प्रवेश मिळाले नाही, त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीपूर्वी पसंतीक्रम बदलावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT