Milind Narvekar & Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uday Samant: "मिलिंद नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांनादेखील राजकीय ताकद दिली होती"

मुख्यमंत्री आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात जवळीक

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात जवळीक वाढताना दिसत आहे. त्यांच्या गाठीभेटीही वाढलेल्या दिसून आल्या. गणेशोत्सवाच्या दरम्यान एकनाथ शिंदे हे नार्वेकर यांच्या घरी दर्शनासाठी गेले होते. दरम्यान राज्य सरकारकडून मविआच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली पण मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. अशातच शिंदे गटाकडून नार्वेकर यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

दरम्यान पुन्हा मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का? या चर्चा राजकारणात रंगू लागल्या. अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीदेखील आज मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे. 'मी शिवसेनेत येण्याआधी मिलिंद नार्वेकर यांनी माझी उद्धव ठाकरे यांची भेट घालून दिली होती. ते सर्वाना मदत करता. आम्ही सदैव मिलिंद नार्वेकरांसोबत आहोत, मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येत असतील तर त्यांचं स्वागत करू असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की. 'आम्ही जरी आज तरी मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत नसलो तरी त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. प्रत्येक माणसाला मदत करणारी ती व्यक्ती आहे. मलादेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आणण्यात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घडवून देण्यात मिलिंद नार्वेकर अग्रेसर होते. त्यामुळे आम्ही जरी शिंदेंसोबत असलो तरी मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल आमच्याकडून वाईट चितलं जाणार नाही. मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांनादेखील राजकीय ताकद दिली होती”, असं म्हणत उदय सामंत यांनी एक प्रकारे नार्वेकर यांचं कौतुकच केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT