CCI
CCI 
महाराष्ट्र

इम्रान खान यांचे पोस्टर सीसीआयने झाकले

सकाळवृत्तसेवा

मुंबई - भारतीय क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेल्या क्रिकेट क्‍लब ऑफ इंडियाने अर्थात सीसीआयने इम्रान खान यांचे पोस्टर झाकले आहे. त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये असलेले हे पोस्टर पुलवामा हल्ल्यानंतर उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियेचा भाग म्हणून झाकण्यात आले आहे.

सीसीआयमध्ये अनेक माजी क्रिकेटपटूंची पोस्टर आहेत. त्यात सध्याचे पाक पंतप्रधान, तसेच पाकचे माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खानही आहेत. आमच्या क्‍लबमध्ये अनेक माजी क्रिकेटपटूंची पोस्टर आहेत. सध्या जे काही सुरू आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे पोस्टर झाकले आहे. ते कधी खुले होईल, याबाबत काहीच सांगणे आता अयोग्य होईल, असे सीसीआयचे अध्यक्ष प्रेमल उदानी यांनी सांगितले.

मिनर्व्हाचा श्रीनगरमध्ये खेळण्यास नकारच
पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर मिनर्व्हा पंजाबने रेयाल काश्‍मीरविरुद्धची श्रीनगरमधील लढत खेळण्यास नकार दिला. पुलवामा हल्ल्यानंतर काही तासांतच लढतीचे ठिकाण बदलण्याची विनंती मिनर्व्हा पंजाबने केली होती. मात्र, भारतीय फुटबॉल महासंघाने यास नकार दिला. सुरक्षेबाबतचे कोणतेही ठोस आश्‍वासन
न मिळाल्याने मिनर्व्हाने श्रीनगरमध्ये न खेळण्याचे ठरवले. मिनर्व्हा लढत न खेळल्याने रेयाल काश्‍मीरला तीन गुण मिळाले आणि त्यांनी आय लीग क्रमवारीत अग्रस्थान मिळवले. श्रीनगरमधील यापुढील आय लीग लढत 28 फेब्रुवारीस आहे. ही लढत अन्यत्र खेळवण्याची विनंती यापूर्वीच ईस्ट बंगालने केली आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT