sakal exclusive sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात आता बाईक रॅलीला परवानगी बंद! आदेश मोडणाऱ्यांवर कारवाई काय? प्रत्येक वाहनास २ ते १० हजाराचा दंड; सहा महिन्यांच्या शिक्षेचीही तरतूद

विनापरवाना बाईक रॅली काढणाऱ्यांवर पोलिसांकडून मोटार वाहन कायदा १९८८ आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम १८८ व १३५ नुसार कायदेशीर कारवाई केली जाते. मोटार वाहन कायद्यानुसार विनापरवाना बाईक रॅलीत सहभागी प्रत्येक दुचाकीस्वाराला 2 ते 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील रस्त्यांवरून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ खूप मोठी असून दिवसेंदिवस त्यात वाढ देखील होत आहे. रस्ते अरुंद असून वाहनांसाठी पार्किंगची सोय देखील नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच होऊ लागली आहे. याशिवाय बाईक रॅलीमुळे प्रदूषणाचाही विषय गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आता बाईक रॅलीला परवानगी देणे बंद करण्यात आले आहे.

सोलापूर शहरात विविध कारणास्तव आंदोलने, निदर्शने केली जातात. याशिवाय बाईक रॅली देखील काढली जाते. बाईक रॅलीत सहभागी बहुतेक दुचाकीस्वार व मागे बसलेला व्यक्ती हेल्मेटचा वापर करत नाही. बाईक रॅलीमुळे संपूर्ण रस्ता बंद होतो आणि त्यामुळे वाहतूक विस्कळित होऊन सामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर २०१९ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्तांनी सोलापूर शहरातून बाईक रॅली काढण्यावर निर्बंध घातले. त्यानुसार आता सोलापूर शहरातील कोणालाही बाईक रॅलीला परवाना दिला जात नाही. पण, ज्यावेळी स्थानिक पोलिसांकडे बाईक रॅलीसाठी अर्ज करून परवानगी मागितली जाते, त्यावेळी पर्याय काढून परवानगी देण्याचाही पर्याय स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगितला जातो, अशीही वस्तुस्थिती आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

शहरातील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास, प्रदूषण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे बाईक रॅलीसाठी कोणालाही परवानगी दिली जात नाही. पण, शासकीय कार्यक्रमातून जनजागृतीच्या हेतूने बाईक रॅली काढण्यासाठी परवानगी दिली जाते. आदेशाचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाते.

- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

आदेश मोडणाऱ्यांवर कारवाई काय?

विनापरवाना बाईक रॅली काढणाऱ्यांवर शहर पोलिसांकडून मोटार वाहन कायदा १९८८ आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम १८८ व १३५ नुसार कायदेशीर कारवाई केली जाते. मोटार वाहन कायद्यानुसार त्या विनापरवाना बाईक रॅलीत सहभागी प्रत्येक दुचाकीस्वाराला दोन ते दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. याशिवाय महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार सहा महिने शिक्षेची कारवाई देखील होते, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT