India decides not to join mega RCEP trade deal as key concerns not addressed
India decides not to join mega RCEP trade deal as key concerns not addressed 
महाराष्ट्र

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; आरसीईपीला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा

बॅंकॉक, थायलॅंड : वादग्रस्त ठरलेल्या प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी (आरसीईपी) कराराचे भवितव्य पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औद्योगिक आणि कृषी बाजार उपलब्धता आणि शुल्कविषयक मुद्दा उपस्थित केला, त्यामुळे येथे सुरू असलेल्या आशियान परिषदेत या करारावर सह्या होऊ शकल्या नाहीत, अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली.

बँकॉक येथे आशियान देशांची तीन दिवसीय परिषद झाली. या परिषदेत आशियानचे १० सदस्य देश आणि चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत असे सोळा देश मिळून जगातील सर्वांत मोठा मुक्त व्यापार झोन निर्मितीसाठी आरसीईपी करारावर सह्या करणार होते. या वेळी चीनने आरसीईपी करार मान्यतेसाठी रेटा केला. अमेरिकेसोबत प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे बिघडलेला व्यापारी ताळेबंद सुस्थितीत आणण्यासाठी आणि पूर्वेकडील बाजारपेठांची उपलब्धता वाढविण्यासाठी चीनने या परिषदेत करार मान्यतेसाठी विशेष प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. या वेळी भारत वगळता इतर १५ देश या करारावर सह्या करण्यास तयार आहेत.

भारताने या वेळी औद्योगिक आणि कृषी बाजार उपलब्धता आणि शुल्कविषयक मुद्दा उपस्थित केला. भारताने या करारावर सह्या केल्यास चीनमधून कृषी आणि औद्योगिक वस्तूंचा पूर देशात येईल आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, ही भीती त्यामागे होती. देशातील उद्योग आणि शेती क्षेत्राला संरक्षण देण्यासाठी भारताने बाजार उपलब्धता आणि संरक्षित वस्तूंचा मुद्दा उपस्थित केला आहे.

'मेक इन इंडिया,' 'बाय फ्रॉम चायना' बनले
मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेले 'मेक इन इंडिया' 'आरसीईपी' करारामुळे 'बाय फ्रॉम चायना' बनले आहे. या मुक्त व्यापार करारामुळे देशात चीनमधून स्वस्त वस्तूंचा पूर येईल, त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार जाईल आणि अर्थव्यवस्था पुन्हा रसातळाला जाईल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत : चीन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, 'आरसीईपी'तून सर्वच बाजूंनी रास्त फायदा मिळावा, भारताला आणि सर्व भागीदार देशांनाही लाभ मिळावा अशी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती, त्यावर आशियान परिषदेत येऊ घातलेला करार ही प्रेरणादायी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेत सर्वच भागीदारांच्या अपेक्षा पूर्ण होतीलच असे नाही, असे चीनने म्हटले आहे.

भारतासाठी आरसीईपीचे दरवाजे पूर्णतः उघडे : ऑस्ट्रेलिया
'भारताच्या नवीन मागणीने 'आरसीईपी' कराराला उशीर होत आहे. 'आरसीईपी'मध्ये सहभागासाठी इच्छा झाल्यास भारतासाठी दरवाजे नेहमी पूर्णतः उघडे असतील. इतर देश भारताशिवाय करार पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. हा करार भारत आणि सहभागी सर्वच देशांसाठी लाभदायक आहे,' असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT