CM Eknath Shinde Communicate with Teachers
CM Eknath Shinde Communicate with Teachers 
महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर देणार भर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करायची आहे. यासाठी शिक्षकांनीही धोरणाचा लाभ विद्यार्थी-पालकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे,’’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले. तसेच राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितानाच विशेषत: सरकारी शाळांचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच पूर्व प्राथमिक स्तरांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी समिती सभागृहातून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यातील जिल्हाधिकारी यांच्यासह शिक्षकही दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. नवीन शैक्षणिक धोरण आत्मनिर्भर भारतासाठी टाकलेले एक पाऊल आहे. पाचवीपर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेतून दिले जाणार आहे. पूर्व प्राथमिक शिक्षक आंतरराष्ट्रीय करण्याचे ठरविण्यात आले. शिक्षकांच्या योग्य मूल्यमापनाचा यात विचार केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रलंबित मागण्यांवर आश्वासन

  • शिक्षकांचे वेतन वेळेवर जमा होण्यासाठी सूचना देणार

  • केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील

  • शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित केला जाईल

  • अशैक्षणिक कामांचा भार शिक्षकांवर पडणार नाही, यासाठी प्रयत्न

  • शाळाबाह्य मुलांच्या विषयावर मार्ग काढला जाईल

  • शालेय पोषण आणि व्यक्तिगत लाभांच्या योजनातील त्रुटींवर लक्ष देऊ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT