IPS Mokshada Patil
IPS Mokshada Patil 
महाराष्ट्र

IPS Mokshada Patil: महिला IPS अधिकाऱ्याच्या नावाने उकळले पैसे; देशभरातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना गंडा

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील महिला आयपीएस अधिकाऱ्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. बनावट ट्विटरवर अकाऊंट उघडून पैसे उकळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (IPS Mokshada Patil Fake Twitter Account Cyber Crime )

छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने हे पैसे उकळण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पाटील यांच्या नावाने ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडले अन्....

एका सायबर भामट्याने आयपीएस मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडले होते.त्यानंतर या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट केले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची पोस्ट टाकली. सोबतच या मुलीला उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे, असा मेसेज केला.

उपचार सुरू असलेल्या मुलीसह एका महिलेचा फोटो आणि क्यूआर कोड ट्विट करून व्हायरल केला. तर हे अकाऊंट मोक्षदा पाटील यांचे असल्याचा विश्वास ठेवून, देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांनी पैसे पाठवून मदत केली आहे.

दरम्यान या सर्व प्रकाराबाबत मोक्षदा पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी लोहमार्ग, ग्रामीण व शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधून बनावट खाते बंद करण्यासाठी ट्विटरला रिपोर्ट करण्याबाबत कळविले. अनेक ठिकाणांवरून ट्विटरला रिपोर्ट गेल्यानंतर 27 मार्चला रात्री 11 वाजेदरम्यान हे बनावट खाते बंद झाले. तसेच या प्रकरणी पैसे उकळणाऱ्याचा शोध सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT