High-Court-Mumbai
High-Court-Mumbai 
महाराष्ट्र

तुरुंगातील रिक्त पदांची माहिती द्या - न्यायालय

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील विविध तुरुंगांमध्ये तुरुंगाधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची किती पदे रिक्त आहेत, याचा अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. १४) राज्य सरकारला दिले. तुरुंगामधील सोई-सुविधांबाबत राधाकृष्णन समितीने दिलेल्या शिफारशींवर काय अंमलबजावणी केली, अशी विचारणाही खंडपीठाने सरकारकडे केली. 

तुरुंगातील कैद्यांना आवश्‍यक सोई-सुविधा देण्याबाबत सरकारने पावले उचलावीत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. त्या आधारावर उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली आहे.

मुख्य न्यायाधीश नरेश पाटील व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर आज याचिकेवर सुनावणी झाली. तुरुंगातील कैद्यांसाठी ‘ओपन जेल’ ही संकल्पना राबवली जात आहे. महत्त्वाच्या तुरुंगांमध्ये ही सुविधा सुरू करण्याचा मानस आहे, अशी माहिती खंडपीठाला देण्यात आली. कैद्यांना चांगले अन्न देण्याची जबाबदारी तुरुंगाधिकाऱ्यांची असून, सरकारने जेवण देण्यापूर्वी त्याचा दर्जा तपासणे गरजेचे आहे, असे न्यायालय म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT