Jayant Patil
Jayant Patil esakal
महाराष्ट्र

महाविकास आघाडी पॅटर्न न राबवल्याने काँग्रेसचा पराभव; जयंत पाटील

सकाळ डिजिटल टीम

देवराष्ट्रे: कडेगाव येथील नगरपंचायत मध्ये  काँग्रेसचा झालेला पराभवा बद्दल जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाष्य केले आहे. ते देवराष्ट्रे येथे क्रांती अग्रणी जी. डी. लाड यांच्या दिनदर्शिका प्रकाशना दरम्यान आले होते. जयंत पाटील यांनी विश्वजित कदम (vishwajeet kadam) यांना टोला दिला आहे. यावेळी आमदार अरुण लाड प्रामुख्याने उपस्थित होते.

कडेगाव येथील नगरपंचायत निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा गडाला सुरुंग लावत व नगरपंचायत एकहाती सत्ता आणली या निवडणुकीत राष्ट्रवादीने एंट्री होती. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी पॅटर्न कडेगाव नागरपंचायतीत राबवावा व महाविकास आघाडीची सत्ता यावी अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. परंतु काँग्रेसने राष्ट्रवादीला जमेत न धरता स्वतंत्र लढले व राष्ट्रवादीला जमेत न घेतल्यामुळे काँग्रेसची सत्ता आली नाही. येणाऱ्या काळात महाविकास आघाडी धर्म पाळावा व एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात याचा महाविकास आघाडीला फायदा होईल. याचा विचार काँग्रेसने करावा असा टोला जयंत पाटील  विश्वजित कदम यांना दिला.

यावेळी वैभव पाटील, मोहनराव मोरे, सरपंच प्रकाश मोरे, बाबासो महिंद,धोंडीराम महिंद,सुरेश शिंगटे,रमेश एडके, बाबासो वत्रे,वैभव पवार,धेर्यशील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT