Jayant Patil
Jayant Patil esakal
महाराष्ट्र

मंत्र्यानी जिल्हा बॅंकेत जाणे चांगले नव्हे; जयंत पाटील

सकाळ डिजिटल टीम

सांगली: आमच्या पक्षाचे चिन्ह घड्याळ असले तरी माझे व घड्याळाचे कधीच जमले नाही. मला कार्यक्रमाला यायला नेहमी उशीर होत असतो. आता तर धनुष्यबाण व हाताच्या नादाला लागून घड्याळ्याची वेळ चुकू लागली आहे, अशी मार्मिक टिप्पणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil)यांनी केली.जिल्हा मध्यवर्ती बँकेत स्व. गुलाबराव पाटील पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी टोलेबाजीही केली. यावेळी कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) उपस्थित होते. (Jayant Patil Sangli News)

जयंत पाटील म्हणाले,काही जिल्ह्यात मंत्री जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात वर्णी लावून घेत आहेत. हे चुकीचे आहे. त्यांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या विधानाचा रोख कुणाकडे होता? शेजारील कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात केडीसीचे अध्यक्ष त्यांच्या पक्षाचेच मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) झाले आहेत, याची चर्चा जोरात रंगील आहे.

'अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीसारख्या संकटाला द्राक्ष आणि डाळींब उत्पादकांना सातत्याने सामोरे जावे लागते. पावसाने झालेले नुकसान आणि पीक विमा कंपन्यांचे निकष यामध्ये मेळ लागत नसल्याने बागायतदार मदतीपासून वंचित राहतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेने द्राक्ष उत्पादकांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन त्यांना कर्जवसुलीत सवलत द्यावी. हप्ते पाडून कर्जवसुलीस मुदतवाढ द्यावी.'

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘गुलाबराव पाटील यांनी सहकार क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला. नैतिकता, स्वच्छ चारित्र्य या बळावर त्यांनी राजकारण, समाजकारण केले. चांगले काम केलेल्या माणसाची लोक नेहमीच दीर्घकाळ पूजा करतात, अगदी त्याप्रमाणेच गुलाबराव पाटील हे मनाने उमदे, निस्पृह असल्याने व त्यांनी सहकारात केलेल्या कामामुळे त्यांच्याबद्दल आजही राज्यभरात विलक्षण आदर आहे.’’असे ही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT