Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar Sakal
महाराष्ट्र

Ravindra Dhangekar : धंगेकरांनी शपथविधीवेळी आपल्या नावापुढे लावलं आईचे नाव

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकर यांचा आज विधीमंडळात शपथविधी झाला. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून नवनिर्वाचित आमदार धंगेकरांनी आज शपथ घेतली. शपथ घेताना त्यांनी आपल्या नावापुढे आपल्या आईचे नाव लावले आहे.

शपथ घेताना रविंद्र धंगेकर म्हणाले की, "मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नमस्कार करतो. मी रविंद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने..." असा उल्लेख करत धंगेकरांनी शपथ घेतली.

दरम्यान, रविंद्र धंगेकर कसब्यातून निवडून आल्यानंतर "हू इज धंगेकर" हा चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराता मारलेला डायलॉग खूप फेमल झाला होता. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून धंगेकर विजयी झाले होते. तर कसब्याची निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची होती. ही निवडणूक हरल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT